पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक मांढरे यांना राष्ट्रपतीचे पोलीस पदक

By जितेंद्र दखने | Published: August 15, 2022 02:23 AM2022-08-15T02:23:31+5:302022-08-15T02:25:21+5:30

ठाणे शहर पोलीस दलात १९८७ मध्ये भरती झालेले मांढरे हे गेल्या दोन वर्षांपासून उपनिरीक्षक पदावर कापूरबावडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

President's Police Medal to Police Sub-Inspector Valmik Mandhare | पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक मांढरे यांना राष्ट्रपतीचे पोलीस पदक

पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक मांढरे यांना राष्ट्रपतीचे पोलीस पदक

googlenewsNext

ठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कापूरबावडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक मांढरे यांना उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे.आपल्याला हे पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठाणे शहर पोलीस दलात १९८७ मध्ये भरती झालेले मांढरे हे गेल्या दोन वर्षांपासून उपनिरीक्षक पदावर कापूरबावडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

त्यांनी पोलीस सेवेमध्ये विशेष शाखा, भिवंडी, येथे १९८९ ते ९१ या कालावधीमध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे. १९९२ ते सन २००२ या दरम्यान त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) २०० लाचखोर सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. तसेच अवैद्य मालमत्ता बाळगल्या प्रकरणी अनेकांवर त्यांनी गुन्हे दाखल केले होते. ठाणे एसीबी मध्ये त्यांना १७७ बक्षिसे प्राप्त केली होती. कळवा, श्रीनगर कापुरबावडी आदी पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असतांना त्यांनी अनेक, घरफोडी, चोरी, जबरी चोरी आणि दरोडा असे मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. 

तसेच खून, खुनाचा प्रयत्न आणि लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्येही त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. २००४ मध्ये त्यांना पोलीस महासंचालक यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरविले आहे. ते ३५ वर्षांच्या सेवा कालावधीत एकही दिवस गैरहजर राहिले नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. त्यांना आतापर्यंत पोलीस खात्यात ३५१ बक्षीसे देऊन गौरव करण्यात आला आहे. देऊन वरिष्ठांनी गौरविले आहे.

Web Title: President's Police Medal to Police Sub-Inspector Valmik Mandhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.