मुंबई-नागपूर समृद्धीच्या जमीनखरेदीसाठी दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 01:59 AM2017-08-05T01:59:43+5:302017-08-05T01:59:43+5:30

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला होणारा विरोध मोडून काढत वाशाळा ग्रामपंचायत हद्दीतील विशाखा धानके यांना दमबाजी करत तिचे संमतीपत्र घेतल्याचा आरोप उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्यावर करण्यात आला आहे.

 Pressure for land purchase of Mumbai-Nagpur Samriddhi | मुंबई-नागपूर समृद्धीच्या जमीनखरेदीसाठी दबाव

मुंबई-नागपूर समृद्धीच्या जमीनखरेदीसाठी दबाव

Next

आसनगाव : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला होणारा विरोध मोडून काढत वाशाळा ग्रामपंचायत हद्दीतील विशाखा धानके यांना दमबाजी करत तिचे संमतीपत्र घेतल्याचा आरोप उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्यावर करण्यात आला आहे. याबाबत धानके तक्रार करणार असल्याचे समजताच ते संमतीपत्र फाडून टाकण्यात आल्याचा आरोप गायकर यांच्यावर करण्यात आला, पण तो गायकर यांनी फेटाळून लावला.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाºयांच्या या दबंगगिरीबद्दल या विधवेच्या परदेशातील मुलींना कळताच, त्यांनी भारतीय दूतावासात तक्रार करण्याचा इशारा संबंधित अधिकारी तसेच कर्मचाºयांना दिला. त्यामुळे घाबरलेल्या अधिकाºयांनी संमतीपत्र फाडूनच टाकले. मात्र, अधिकाºयांच्या धाकदपटशाने घाबरलेल्या या महिलेने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत न्यायाची मागणी केली आहे.
वाशाळा ग्रामपंचायत हद्दीतील गट नं. ३८१ मधील १ हेक्टर ७४ गुंठे, गट नं. ३७४ मधील ६६ गुंठे शेतजमीन समृद्धी महामार्गाखाली जाणार आहे. या शेतजमिनी विशाखा विनायक धानके आणि त्यांच्या मुली रिमा
सचिन पवार आणि रश्मी राहुल म्हात्रे यांच्या नावावर आहेत. या जमिनींना आज कोणतेही कूळ नसल्याने ही जमीन आदिवासी मजुरांना लागवडीसाठी देऊन अनेक वर्षांपासून कसली जात आहेत. समृद्धीच्या जमीन खरेदीसाठी महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी आणि त्यांच्या कर्मचाºयांनी कार्यालयात बोलावून दमबाजी केली. या जमिनींवर आदिवासींनी हक्क सांगितला असून जमीनविक्रीच्या पैशांतील काही पैसे आम्हाला तसेच आदिवासींना द्यावे लागणार असल्याचे सांगत संमतीपत्रावर जबरदस्तीने सह्या घेतल्याचा आरोप धानके यांनी केला.
गोंधळलेल्या धानके यांनी हा प्रकार लंडन येथे स्थायिक असलेल्या मुलींना सांगितला. त्यांनी रेवती गायकर यांच्याविरोधात भारतीय दूतावासात तक्रार करण्याचा इशारा देताच ते संमतीपत्र अधिकाºयांनी फाडून त्याचे फोटो मुलींना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवले. मात्र, भेदरलेल्या धानके यांनी ठाणे पोलीस अधीक्षक, ठाणे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देत जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.

 

Web Title:  Pressure for land purchase of Mumbai-Nagpur Samriddhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.