ठाण्यात दिग्गज पुढाऱ्यांकडून होणारा लसींचा गोलमाल रोखा : आ. संजय केळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:42 AM2021-05-07T04:42:44+5:302021-05-07T04:42:44+5:30

ठाणे : ठाण्यात बेड, इंजेक्शननंतर आता दिग्गज पुढाऱ्यांकडून लसीचा गोलमाल सुरू झाला आहे. ठाणे महापालिकेच्या बहुतांश आरोग्य केंद्रांवर काही ...

Prevent vaccine smuggling from veteran leaders in Thane: b. Sanjay Kelkar | ठाण्यात दिग्गज पुढाऱ्यांकडून होणारा लसींचा गोलमाल रोखा : आ. संजय केळकर

ठाण्यात दिग्गज पुढाऱ्यांकडून होणारा लसींचा गोलमाल रोखा : आ. संजय केळकर

Next

ठाणे : ठाण्यात बेड, इंजेक्शननंतर आता दिग्गज पुढाऱ्यांकडून लसीचा गोलमाल सुरू झाला आहे. ठाणे महापालिकेच्या बहुतांश आरोग्य केंद्रांवर काही बड्या पुढाऱ्यांच्या हस्तकांकरवी यंत्रणेवर दबाव आणला जात असून, टोकन न घेताच केंद्रातील लसीच्या साठ्यावर परस्पर डल्ला मारला जात असल्याचा धक्कादायक आरोप ठाण्याचे आमदार संजय केळकर यानी केला आहे. या पुढाऱ्यांना रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

ठाणे महापालिकेच्या लसीकरण मोहिमेत सुरू असलेल्या अनागोंदीचे पडसाद काही दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले होते. काही सत्ताधारी मंडळी हस्तकांकरवी ठाणे महापालिकेच्या केंद्रांत लसींचा साठा आपआपल्या प्रभागातील नागरिकांना देण्यास केंद्र संचालकांना भाग पाडत असल्याचे आरोप याच बैठकीत झाले होते. त्यानंतर पालिकेच्या ग्लोबल रुग्णालयातदेखील पुढाऱ्यांमार्फत आलेल्या वशिलेबाजांना व्हीआयपी कक्षात विनाटोकन लसीकरण सुरु असल्याची बाब भाजपने समोर आणली होती. या पार्श्वभूमीवर आमदार केळकर यांनी लसीकरणात गोलमाल सुरु असल्याचे म्हटले असून, काही हेवीवेट पुढाऱ्यांकडून लसीकरणात सुरु असलेला हस्तक्षेप रोखण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.

एकीकडे सर्वसामान्य नागरिक रांगेत उभे राहून लस घेत असताना काही नेतेमंडळी घुसखोरी करून टोकनशिवाय आपआपल्या परिचितांना लसींचा फायदा मिळवून देण्यास पुढाकार घेत आहेत. एखाद्या केंद्रात १०० लसींचा साठा आला, तर पुढारी मंडळी त्यातील ५० लसी स्वतःसाठी राखून ठेवण्यास केंद्र संचालकांना धमकावतात. त्यामुळे टोकन घेऊन रांगेत उभे राहिलेल्या नागरिकांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन कारवाई करण्याच्या सूचना केळकर यांनी केल्या आहेत.

Web Title: Prevent vaccine smuggling from veteran leaders in Thane: b. Sanjay Kelkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.