नेवाळी आंदोलनाच्या मुळाशी जमिनीचा भाव

By admin | Published: June 24, 2017 12:33 AM2017-06-24T00:33:54+5:302017-06-24T00:33:54+5:30

नेवाळीची जागा संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे, याबद्दल दुमत नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर ती जागा शेतकऱ्यांना परत करण्याच्या आश्वासनाभोवती तेथील आंदोलन फिरते आहे

The price of the land at the base of the New Delhi movement | नेवाळी आंदोलनाच्या मुळाशी जमिनीचा भाव

नेवाळी आंदोलनाच्या मुळाशी जमिनीचा भाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : नेवाळीची जागा संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे, याबद्दल दुमत नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर ती जागा शेतकऱ्यांना परत करण्याच्या आश्वासनाभोवती तेथील आंदोलन फिरते आहे. पण नेवाळीला विमानतळ करण्याची मागणी पुढे आली आणि गेल्या तीन वर्षांत त्या जागेभोवती जे भव्य प्रकल्प उभे राहिले. त्यातून जमिनीला सोन्याहून अधिक भाव आला आणि हे आंदोलन भडकत गेले. ब्रिटिशांच्या काळातील लाभार्थी आणि आता ज्यांच्या ताब्यात जमिनी आहेत त्यांना मिळणारा गडगंज पैसा यातून असंतोष खदखदत गेला. त्याला बिल्डरांनी, राजकारण्यांनी खतपाणी घातले आणि त्याची परिणती हिंसक आंदोलनात झाल्याचे गावकऱ्यांशी बोलल्यानंतर जाणवले.
राज्य सरकारने २०१५ साली २७ गावांत कल्याण ग्रोथ सेंटरची घोषणा केली. त्यासाठी एक हजार ८९ हेक्टर जागा घेतली जाणार आहे. त्यासाठी एक हजार ८९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हे ग्रोथ सेंटर भव्य गृहसंकुलांमध्ये आहे आणि आंदोलन झालेली त्याला लागून आहेत. भाल, द्वारली ही गावे कल्याण तालुक्यातील आहेत. ही गावे नेवाळी एरोड्रमच्या जागेत बाधित झालेली आहेत. नेवाळी, नेवाळी पाडा, चिंचवली, खोणी, वसार, माणेरा, तीसगाव, आडिवली, वडवली, धामटण ही अंबरनाथ तालुक्यातील गावे एरोड्रमच्या जागेने बाधित आहेत. या गावांना लागून आणखी काही बड्या बिल्डरांचे प्रकल्प सुरू आहेत. खोणी-तळोजा मार्ग हा तळोजा एमआयडीसीकडे जातो. हा मार्ग तळोजा-डोंबिवली, अंबरनाथ एमआयडीसीला जोडणारा महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावरही बिल्डरांनी हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. अंबरनाथ-पाले गावातही गृहप्रकल्प सुरु आहेत. तसेच उल्हासनगर गायकवाड पाडामार्गे अंबरनाथ-शीळ रस्त्यावर काही गृहप्रकल्प सुरु आहेत. याशिवाय कल्याण चक्की नाका ते मलंगगड रोडवर नांदिवली, द्वारली, भाल या भागात रस्त्यालगत चार ते आठ मजली इमारती उभ्या आहेत. या इमारती कुणाच्या परानगीने इतक्या उंच झाल्या, हे कोणी सांगायला तयार नाही. त्या बेकायदा आहेत, का याची शहानिशा कधी महसूल खात्याने केली नाही. हे क्षेत्र एमएमआरडीएच्या अखत्यारीत येते. त्यांनीही या बांधकामांना परवानगी दिलेली नाही. त्यामुले आपल्याभोवती हा सगळा ‘विकास’ होत असताना आपल्या जमिनी गुंतून पडल्या आणि आपण कोरडेच राहिल्याची तीव्र भावना नेवाळी विमानतळासाठी जमिनी गेलेल्या ग्रामस्थांत आहे.
संबंधित वृत्त/पान २

Web Title: The price of the land at the base of the New Delhi movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.