डोंबिवलीकर असल्याचा अभिमान - कुशल बद्रिके

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 08:31 PM2018-05-23T20:31:22+5:302018-05-23T20:31:22+5:30

मनोरंजनाबरोबरच कला आणि क्रीडा क्षेत्रात डोंबिवलीतील हरहुन्नरी रत्ने चमकत असून डोंबिवलीचा झेंडा अटकेपार पोचवत आहेत हे खरोखरच गौरवास्पद आहे. या सुसंस्कृत शहरात आपण राहत असल्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे गौरवोद्गार प्रख्यात कलाकार कुशल बद्रिके याने काढले.

 The pride of being a Dombivlikar - Kushal Badrike | डोंबिवलीकर असल्याचा अभिमान - कुशल बद्रिके

डोंबिवलीकर असल्याचा अभिमान - कुशल बद्रिके

Next

डोंबिवली - मनोरंजनाबरोबरच कला आणि क्रीडा क्षेत्रात डोंबिवलीतील हरहुन्नरी रत्ने चमकत असून डोंबिवलीचा झेंडा अटकेपार पोचवत आहेत हे खरोखरच गौरवास्पद आहे. या सुसंस्कृत शहरात आपण राहत असल्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे गौरवोद्गार प्रख्यात कलाकार कुशल बद्रिके याने काढले. डोंबिवलीतील स्पोर्ट्स अकॉर्ड फाउंडेशनच्या वतीने ४ मे ते १९ मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी शिबिराची सांगता बद्रिके यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी एशियन चाम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या ईश्वरी शिरोडकर आणि अमेय शिंदे या खेळाडूंचा बद्रिके यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
डोंबिवलीतील खेळाडूना व्यासपीठ आणि संधी मिळवून देण्यासाठी डॉ. मिलिंद शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या स्पोर्ट्स अकॉर्ड फाउंडेशन या संस्थेकडून जिम्नॅस्टिक्स, बडमिंटन,अथलेटीक्स, स्विमिंग आणि योगा या खेळाचे प्रशिक्षित प्रशिक्षका कडून मार्गदर्शन केले जात असून या संस्थेत ५० पेक्षा जास्त खेळाडू दररोज सराव करतात. यात २० खेळाडू जिम्नॅस्टिक्सचा सराव करत असून त्यांना सतीश पाटील आणि प्रसाद दारवेकर या प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन केले जाते. या संस्थेचे खेळाडू असलेल्या ईश्वरी शिरोडकर आणि अमेय शिंदे यांनी यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी करताना इसाक फेडरेशन मार्फत खेळलेल्या इंडियन ओपन स्पर्धेत देखील सुवर्ण आणि रौप्य पदकावर नाव कोरले होते. या खेळाडूसह डोंबिवलीतील इतर खेळाडूना संस्थेची माहिती व्हावी आणि उन्हाळी शिबिराचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने संस्थेने डोंबिवलीतील सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलातील बंदिस्त सभागृहात आयोजित केलेल्या उन्हाळी शिबिराला खेळाडूचा चांगला प्रतिसाद लाभला होता. यावेळी फाउडेशनचे अध्यक्ष डॉ.मिलिंद शिरोडकर, जयंत शिंदे, माजी नगरसेवक राजन मराठे, भाजपा साउथ सेल चे अध्यक्ष मोहन नायर, यांच्यासह खेळाडू आणि पालक मोठ्या संखेने उपस्थित होते. या शिबिराची सांगता एम्स रुग्णालयाच्या सभागृहात करण्यात आली यावेळी संस्थेचे विश्वस्त जयंत शिंदे यांनी क्षमता असलेल्या खेळाडूना संधी देण्यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील राहील असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालचंद्र म्हात्रे यांनी केले. यावेळी शिबिराथीर्ना स्मृतीचीन्हाने गौरविण्यात आले.

 

Web Title:  The pride of being a Dombivlikar - Kushal Badrike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.