ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक - माध्यमिक   शाळा बुधवारपासून सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 10:18 PM2021-01-22T22:18:38+5:302021-01-22T22:19:04+5:30

शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशांचे पालन करणे संबंधित शाळा प्रशासनावर बंधनकारक असेल, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.

Primary-secondary schools in rural areas of Thane district start from Wednesday | ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक - माध्यमिक   शाळा बुधवारपासून सुरू 

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक - माध्यमिक   शाळा बुधवारपासून सुरू 

Next

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या तसेच आश्रमशाळाशाळा बुधवारी २७ जानेवारीपासून सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी  दिले. शहरी भागांतील सर्व शाळांबाबत स्वतंत्रपणे राज्य शासनाच्या निर्देशांप्रमाणे निर्णय घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळा विद्यार्थ्यांसाठी १६ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु आता ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व व्यवस्थापनाच्या ५ वी ते १२ वीपर्यतच्या शाळांसह आश्रमशाळा सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री दिले आहेत. शहरी भागांतील सर्व शाळांबाबत स्वतंत्रपणे राज्य शासनाच्या निर्देशांप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.अंबरनाथ व कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील शाळांबाबत वेगळे निर्देश देण्यात येणार आहे. 

शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशांचे पालन करणे संबंधित शाळा प्रशासनावर बंधनकारक असेल, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. तर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५ ते ८ वीपर्यंतच्या शाळा या आदेश अनुसरुन सुरु करण्यात येत आहे. यासाठी सर्व शिक्षकांच्या प्रथम कोरोनाच्या अँटीजेन स्टेस्ट करण्यात येणार आहे. या तपासणीनंतर दोन शिक्षक शाळांवर उपस्थित ठेवले जाणार आहे. या तपासणीत शिक्षकात कोरोनाचे सिमटंन्स आढळून आल्यास त्यावर त्वरीत उपचाराच्या दृष्टीने सर्व तपासण्या करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Primary-secondary schools in rural areas of Thane district start from Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.