Prime Hospital Fire: प्राईम हॉस्पीटल दुर्घटना प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करणार; जितेंद्र आव्हाडांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 12:17 PM2021-04-28T12:17:23+5:302021-04-28T12:17:48+5:30

Mumbra Hospital Fire: मुंब्रा येथील एम एस प्राईम क्रिटीकेअर या रुग्णालयामध्ये पहाटे आग लागून त्यात अतिदक्षता विभागातील 6 पैकी 4 रुग्णांचा मृत्यू झाला.

Prime Hospital Accident: Inquiry Committee to be appointed: Jitendra Awhad | Prime Hospital Fire: प्राईम हॉस्पीटल दुर्घटना प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करणार; जितेंद्र आव्हाडांची घोषणा

Prime Hospital Fire: प्राईम हॉस्पीटल दुर्घटना प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करणार; जितेंद्र आव्हाडांची घोषणा

Next

ठाणे (प्रतिनिधी)-  मुंब्रा येथील एम एस प्राईम क्रिटीकेअर या रुग्णालयामध्ये पहाटे आग लागून त्यात अतिदक्षता विभागातील 6 पैकी 4 रुग्णांचा मृत्यू झाला. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस, ठामपा अधिकारी आणि डॉक्टर यांची चौकशी समिती नेमण्यात येणार असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख तर जखमींच्या नातेवाईकांना एक लाखांचे अर्थसाह्य करण्यात येणार आहे, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली.


बुधवारी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी ही आग लागली होती. शॉट सर्किटमुळे आग लागण्याचे सांगण्यात येत आहे. या चौघांचा मृत्यु हा आगीमुळे नाही तर आगीच्या घटनेनंतर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले. त्यांना दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये हलविण्याच्या दरम्यान त्यांचा मृत्यु झाला असे ठाणे महापालिकेकडून सांगण्यात आले.  यास्मीन सय्यद (वय 46), नवाब शेख (वय 47) हलिमा सलमानी (वय 70) आणि हरीश सोनावणे (वय 57) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत.
या दुर्घटनेची माहिती मिळताच अवघ्या 10 मिनिटातच गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी भेट दिली. येथील मृतांच्या कुटुंबियांना भेटून त्यांनी त्यांचे सांत्वन केले. प्रचंड अंधार दाटलेला असतानाही डॉ. आव्हाड यांनी जळीत रुग्णालयात प्रवेश करुन मदतीचे कार्य स्वत: हाती घेतले.  


या संदर्भात त्यांनी सांगितले की,  पहाटेच्या सुमारास कौसा येथील प्राईम रुग्णालयाला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आहे. एकंदर 20 रुग्ण होते. त्यातील 4 जण मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कशामुळे आग लागली, याची चौकशी  केली जाईल. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जखमींनाही एक लाख रुपये  दिले जातील. प्रामुख्याने ही घटना का घडली, कशी घडली? याची चौकशी  ठाणे महानगर पालिकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि डॉक्टर यांच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करुन अभिप्राय देतील.

Web Title: Prime Hospital Accident: Inquiry Committee to be appointed: Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.