पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 

By सुरेश लोखंडे | Published: September 30, 2024 06:00 PM2024-09-30T18:00:16+5:302024-09-30T18:03:23+5:30

पंतप्रधानांच्या या दौऱ्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्थांचे नियोजन करण्यासाठी विविध जबाबदाऱ्यांची निश्चिती या पूर्व आढावा बैठकीत करण्यात आली आहे.

Prime Minister Narendra Modi visits Thane district on Wednesday; Officials held a preliminary review meeting!  | पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 

ठाणे : ठाणे शहराजवळील कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम ५ ऑक्टोबर रोजी पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहणार आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी पूर्वतयारीची बैठक सोमवार ठाणे महापालिका मुख्यालयात पार पडली. या कार्यक्रमाला सुमारे ४० हजार नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असून ठाणे तसेच आसपासच्या महापालिकांमधून सुमारे एक हजार २०० बसगाड्यांची ये-जा घोडबंदर रोड परिसरात होणार आहे. 

पंतप्रधानांच्या या दौऱ्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्थांचे नियोजन करण्यासाठी विविध जबाबदाऱ्यांची निश्चिती या पूर्व आढावा बैठकीत करण्यात आली आहे. या बैठकीस ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महाराष्ट्र मेट्रो रेल महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (समाजविकास) अनघा कदम, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी विकास गजरे, ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील, एमएमआरडीए, महामेट्रो अशा विविध महत्त्वाच्या विभागांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

पावसाळ्याचे दिवस लक्षात घेवून मुख्य सभामंडप, पार्किंग व्यवस्था येथील सर्व नियोजन करण्यात यावे. त्याचबरोबर वीज पुरवठा, इंटरनेट सेवा यांची पर्यायी व्यवस्थाही उपलब्ध करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी दिल्या. तसेच, या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार असल्याने वाहतुकीसाठी बंद होणारे रस्ते, सेवा रस्त्यांच्या वापराची स्थिती आदींबाबत नागरिकांना अवगत करण्यात यावे, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. मुख्य सभामंडप, हेलिपॅड, गाड्या आणि बसेस पार्किंग व्यवस्था, वीज पुरवठा, सीसीटीव्ही नेटवर्क, जोड रस्ते यांच्या सद्य:स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. बसगाड्यांची पार्किंग व्यवस्था, अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचे प्रवास मार्ग आदींबाबत या बैठकीत पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी सादरीकरण केले.

या कार्यक्रमासाठी येणाऱ्या सुमारे १२०० बसगाड्यांच्या पार्किंगचे नियोजन महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. त्या जागा ताब्यात घेण्यात आल्या असून त्यांचे सपाटीकरण आदी कामे करण्यात येत असल्याची माहिती नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी दिली. तर, मुख्य सभामंडप आणि हेलिपॅड यांच्या व्यवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांनी माहिती दिली. या बैठकीनंतर उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळाचीही एकत्रित पाहणी केली.

Web Title: Prime Minister Narendra Modi visits Thane district on Wednesday; Officials held a preliminary review meeting! 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.