पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल

By जितेंद्र कालेकर | Published: October 3, 2024 07:40 PM2024-10-03T19:40:08+5:302024-10-03T19:47:29+5:30

कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा आयोजित केला आहे. 

Prime Minister Narendra Modi's visit to Thane, changes in city traffic | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल

ठाणे : घोडबंदर रोड भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ५ ऑक्टोबर राजी दौरा आयोजित केला आहे. त्यानिमित्त वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी ठाणे शहरातील वाहतूक मार्गांमध्ये बदल केला असून काही मार्गांवर वन वे वाहतूक केल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने गुरुवारी दिली. कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा आयोजित केला आहे. 

या कार्यक्रमास महत्वाच्या आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींसह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान ठाणे ते घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ता, डीमार्ट ते टायटन हॉस्पिटल, घोडबंदर ठाणे वाहिनी सर्व्हिस रोड, ओवळा ते वाघबीळ नाक्यापर्यंत वाहने उभी पार्क करण्यास मनाई असून हा मार्ग एक दिशा मार्ग (वन वे) केला आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, ती सुरळीत राहण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी शहरातील वाहतूकीमध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

ठाणे घोडबंदर वाहिनी :
टायटन हॉस्पिटल कडून डीमार्टकडे सर्व्हिस रोडने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना टायटन हॉस्पिटल येथे प्रवेश बंद केला आहे. त्याऐवजी ही वाहने टायटन हॉस्पिटलकडून डीमार्टकडे जाण्यासाठी ओवळा सिग्नल येथून मुख्य रस्त्याने कासारवडवली, वाघबीळ ब्रिजखालून सोडली जातील.

घोडबंदर ठाणे वाहिनी : 
वाघबीळ नाक्या कडून ओवळयाकडे सर्व्हिस रोडने जाणाऱ्या सर्व वाहनांना वाघबीळ नाका, सिग्नल येथे प्रवेश बंद राहील. त्याऐवजी ही वाहने वाघबीळ नाक्याकडून आनंदनगर आणि कासारवडवलीकडे जाण्यासाठी टीजेएसबी बँक चौक, चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क मार्गे जातील. ही वाहने वाघबीळ नाका कडून ओवळया कडे जाण्यासाठी वाघबीळ ब्रिजखालून मुख्य रस्त्याने साेडली जातील.

असा आहे नो पार्किंग झोन
टायटन हॉस्पिटल ते डीमार्ट सर्व्हिस रोड तसेच वाघबीळ नाका ते आनंदनगर नाका नो पार्किंग झोन राहणार आहे. ही वाहतूक अधिसूचना ३ ऑक्टोबर रोजी रात्री ते कार्यक्रम संपेपर्यंत अंमलात राहणार आहे. पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडोर, ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हा आदेश लागू राहणार नसल्याचेही उपायुक्त शिरसाठ यांनी आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे.

Web Title: Prime Minister Narendra Modi's visit to Thane, changes in city traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.