पंतप्रधान कार्यालय हे वसुलीचे कार्यालय तर पवार-ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोब जाणार: प्रकाश आंबेडकर
By नितीन पंडित | Published: May 18, 2024 09:20 PM2024-05-18T21:20:23+5:302024-05-18T21:20:32+5:30
शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या क्षणी भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत आंबेडकर बोलत होते.
भिवंडी: मुंबईमध्ये महायुती व महाविकास आघाडी यांच्या सभा म्हणजे तमाशा असून एकमेकांना शिव्या घालण्याशिवाय तेथे दुसरे काही झालेच नाही.पुढच्या पाच वर्षात काय करणारा हे कोणीही सांगितले नाही.पंतप्रधानांचे कार्यालय हे वसुलीचे कार्यालय झाले आहे.त्यामुळे या दहा वर्षात १७ लाख हिंदू कुटुंबीयांनी देश सोडला,नागरिकत्व सुद्धा सोडले. ज्यांची मालमत्ता ५० कोटी पेक्षा अधिक आहे. जनतेला मानवता सांभाळणारा पंतप्रधान हवा की वसुली करणारा हवा हे ठरवण्याची वेळ आली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या क्षणी भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत आंबेडकर बोलत होते.
"शरद पवार व उद्धव ठाकरे हे निवडणुकी नंतर भाजपा सोबत गेल्याशिवाय राहणार नाहीत हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे. दोघांच्या चौकशा सुरू असल्याने त्यांना पर्याय राहिलेला नाही," असे वक्तव्य देखील आंबेडकर यांनी यावेळी केले.
महायुतीच्या महाराष्ट्रात पाच ते सहा जागा ज्या सुरक्षित आहेत त्या सोडल्या तर उर्वरित ठिकाणी १५ ते २० हजाराने निवडून येतील अशी परिस्थिती आहे.त्यामुळे जे चारशेचा क्लेम करीत होते,४८ जागा निवडून येतील असे सांगणारे भारतीय जनता पार्टी हे सांगण्या पासून स्वतःला रोखत आहेत.ही लाट भाजपा विरोधात आहे.टक्केवारी कमी झाल्यानं त्याचा फटका भाजपाला बसणार आहे.त्यामुळे निकाल अनपेक्षित असतील असेही आंबेडकर म्हणाले असून जे पी नड्डा यांच्या आर एस एस संबंधीच्या वक्तव्यावर विचारले असता,नड्डा यांचे विधान फसवे विधान आहे.त्यासाठी आमचा आर एस एस बरोबर संबंध नाही असे भसवण्याचा भाजपा प्रयत्न करीत आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश आंबेडकर यांना वाहतूक कोंडीचा फटका दुचाकी वरून प्रवास
भिवंडीत प्रचार सभे साठी येताना ठाणे भिवंडी रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा फटका प्रकाश आंबेडकर यांना बसला आहे. कशेळी ते अंजुर फाटा दरम्यान अखेर त्यांनी आपल्या कारमधून उतरून दुचाकी वरून प्रवास करीत भिवंडी येथील सभास्थळ प्रचाराची वेळ संपण्यासाठी अवघे दहा मिनिट शिल्लक असताना गाठले.