मीरा रोडमध्ये बारवर छापा

By admin | Published: February 16, 2017 01:57 AM2017-02-16T01:57:21+5:302017-02-16T01:57:21+5:30

आॅर्केस्ट्रा बाारच्या आड नृत्य व अश्लील प्रकार चालणाऱ्या भार्इंदरच्या अण्णा पॅलेस या बारवर पोलिसांनी छापा टाकून १९ ग्राहकांसह

Print the bar in Meera Road | मीरा रोडमध्ये बारवर छापा

मीरा रोडमध्ये बारवर छापा

Next

मीरा रोड : आॅर्केस्ट्रा बाारच्या आड नृत्य व अश्लील प्रकार चालणाऱ्या भार्इंदरच्या अण्णा पॅलेस या बारवर पोलिसांनी छापा टाकून १९ ग्राहकांसह बारचे कर्मचारी तसेच सहा बारबालांना अटक केली.
नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भार्इंदर फाटक - नवघर मार्गावर असलेल्या अण्णा पॅलेस या बारमध्ये बारबाला सर्रास नृत्य करत असल्याचे व अश्लील प्रकार चालत असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांना मिळाली. त्यांनी भार्इंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कांबळे व अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक संजय बांगर यांना दिले. पोलिसांनी सोमवारी रात्री छापा टाकला. पोलिसांनी बारचे व्यवस्थापक, वेटरसह ग्राहक, सहा बारबालांना अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: Print the bar in Meera Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.