पुरावा नष्ट करण्यासाठी पुरलेले प्रेत पोलिसांनी काढले बाहेर, पत्नीचा खून करणा-या पतीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 04:48 PM2017-10-16T16:48:57+5:302017-10-16T16:52:11+5:30
व्यसनाधीन पतीने सतत मारहाण करून पत्नीला जीवेठार मारून तीचा मृतदेह घराजवळच पुरून पुरवा नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीस अटक केली
भिवंडी - व्यसनाधीन पतीने सतत मारहाण करून पत्नीला जीवेठार मारून तीचा मृतदेह घराजवळच पुरून पुरवा नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीस अटक केली असून पोलिसांनी दंडाधिकारी व पंचांच्या साक्षीने पुरलेले प्रेत बाहेर काढून काल रविवार रोजी रात्रीच्या वेळी शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे.रूग्णालयांत नेले आहे.
लक्ष्मी वन्या कोरडे(२८)असे मयत महिलेचे नांव असुन ती पती वन्या जगन कोरडे(२८) सोबत तालुक्यातील काटई गावात दिवाणमाळ येथे रहात होती.वन्या कोरडे हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला आहे.त्यामुळे त्यांच्या घरांत नेहमी कोणत्याही कारणाने भांडण होत होते.शुक्रवार रोजी रात्रीच्या वेळी दोघांमध्ये जोराचे भांडण होऊन वन्या याने दारूच्या नशेत लक्ष्मीला पोटात लाथा मारल्या तेंव्हा तीने वाचविण्यासाठी आरडाओरड केली.त्यामुळे शेजारील शोभा नरेश दभाले(३५)ही भांडण सोडविण्यास गेली असता तीला वन्या याने मारहाण करण्याची धमकी दिल्याने ती निघुन गेली.दुसºया दिवशी सकाळी शोभा ने लक्ष्मीची विचारपूस केली असता वन्याने ती विष पिऊन मेल्याचे सांगीतले.शनिवारी दिवसभर तीचा मृतदेह घरांत ठेऊन वन्या याने रात्रीच्या वेळी घरापासून २००मीटर अंतरावर तीन फुट खड्डा करून काही लोकांच्या मदतीने लक्ष्मीचा मृतदेह खड्ड्यात पुरला.या घटनेची माहिती शेजारील लोकांनी लक्ष्मीच्या आईला दिली असता ती जव्हारहून आली आणि वन्याला जाब विचारला तेंव्हा त्याने विष पिऊन मेल्याचे सांगीतले.ही घटना निजामपूर पोलीस ठाण्याच्या पोलीसांना समजल्यावर पोलीसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली.काल रविवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास नायब तहसिलदार संदिप आवारी,वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र कोते व इंदिरागांधी स्मृती उपजिल्हा रूग्णालयांतील वैद्यकीय पथकाच्या साक्षीने लक्ष्मी कोरडे हिचा पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रूग्णालयांत पाठविण्यात आला आहे.या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यातील पोलीसांनी गुन्हा दाखल करून वन्या जगन कोरडे यांस अटक केली आहे.(प्रतिनिधी) (सोबत फोटो आहे.)
-------------------------------------------------------