खासगी बसचा उपद्रव : टीएमटीच्या अतिरिक्त कर्मचाºयांचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 06:40 AM2018-02-03T06:40:01+5:302018-02-03T06:40:10+5:30
ठाणे परिवहन सेवेचे प्रवासी बिनदिक्कत गोळा करत शहरात फिरत असलेल्या खाजगी बसगाड्यांना रोखण्याकरिता महत्त्वाच्या बसस्टॉपवर यापुढे परिवहनचे अतिरिक्त कर्मचारी सकाळी आणि संध्याकाळी लक्ष ठेवणार असल्याचे परिवहन प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले.
ठाणे - ठाणे परिवहन सेवेचे प्रवासी बिनदिक्कत गोळा करत शहरात फिरत असलेल्या खाजगी बसगाड्यांना रोखण्याकरिता महत्त्वाच्या बसस्टॉपवर यापुढे परिवहनचे अतिरिक्त कर्मचारी सकाळी आणि संध्याकाळी लक्ष ठेवणार असल्याचे परिवहन प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले. किती खाजगी बसेस टीएमटीच्या स्टॉपवरून प्रवासी घेतात, याचा संपूर्ण अहवाल आरटीओला पाठवण्यात येणार आहे.
परिवहन सदस्य सचिन शिंदे यांनी खासगी बसगाड्यांच्या वावराचा मुद्दा बैठकीमध्ये उपस्थित केला. मागच्या बैठकीमध्ये अशा खाजगी बसवर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. त्यामुळे किती बसवर कारवाई केली, याची माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. नोव्हेंबर महिन्यात आरटीओ आणि परिवहन प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत सात ते आठ खासगी बसगाड्यांवर कारवाई केल्याची माहिती प्रशासनाने दिली. शहरात सध्या तीनशेपेक्षा अधिक खाजगी बस रस्त्यावर धावत असून केवळ आठ बसगाड्यांवरच कशी कारवाई केली, असा प्रश्न शिंदे यांनी केला. त्यावर, ठाणे परिवहनला थेट कारवाई करण्याचे अधिकारच नसल्याकडे सदस्य राजेश मोरे यांनी लक्ष वेधले.
परिवहनचे व्यवस्थापक संदीप माळवी यांनी खाजगी बसगाड्यांवर कारवाई करण्याचे फेरआश्वासन दिले. कारवाई करण्याचे अधिकार आरटीओला असल्याने यापुढे खाजगी बसगाड्यांच्या उपद्रवावर लक्ष ठेवण्यासाठी परिवहनच्या अतिरिक्त कर्मचाºयांना कामाला लावले जाणार असून हे कर्मचारी शहरातील महत्त्वाच्या बसस्टॉपवर उभे राहून लक्ष ठेवतील. त्यांच्या पाहणीतून तयार होणारा अहवाल आरटीओला पाठवण्यात येणार असल्याचे माळवी यांनी स्पष्ट केले.
परिवहनला थेट कारवाईचा अधिकार नाही
शहरात सध्या तीनशेपेक्षा अधिक खाजगी बस रस्त्यावर धावत असून केवळ आठ बसगाड्यांवरच कशी कारवाई केली, असा प्रश्न शिंदे यांनी केला. त्यावर, ठाणे परिवहनला थेट कारवाई करण्याचे अधिकारच नसल्याकडे सदस्य राजेश मोरे यांनी परिवहन समितीच्या बैठकीत लक्ष वेधले.