खाजगी डॉक्टरांनाही ५० लाखांचे विमा कवच द्यायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 12:17 AM2020-09-23T00:17:45+5:302020-09-23T00:19:03+5:30

श्रीकांत शिंदे : संसदेमध्ये आरोग्यमंत्र्यांकडे केली मागणी

Private doctors should also be given insurance cover of Rs 50 lakh | खाजगी डॉक्टरांनाही ५० लाखांचे विमा कवच द्यायला हवे

खाजगी डॉक्टरांनाही ५० लाखांचे विमा कवच द्यायला हवे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोनाकाळात सेवा देणाऱ्या खाजगी डॉक्टरांनाही ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारनेही कोरोनाशी लढणाºया खाजगी डॉक्टरांना हे विमा कवच द्यावे, अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी संसदीय अधिवेशनात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे केली आहे.


सर्व पक्षांनी एकत्रित येऊन कोरोनाची लढाई लढली पाहिजे, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी संसदेत केले. माझ्या मतदारसंघात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने जम्बो कोविड सेंटर उभारली आहेत. मतदारसंघात अ‍ॅण्टिजेन आणि आरटीपीसीआर चाचण्याही वाढविल्या. तापाचे दवाखाने उघडले. मात्र, अनेक रुग्ण हे या दवाखान्यांत येत नव्हते. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली तर कुटुंबाचे काय होईल, अशी भीती त्यांना होती. त्यामुळे रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करता आले, असे ते म्हणाले.

मतदारसंघातील महापालिकांद्वारे रेमिडेसीवीर हे इंजेक्शन खरेदी करून ते महापालिका रु ग्णालयांतून मोफत दिले जात आहे. त्यामुळे मृत्युदर हा नियंत्रणात व कमी ठेवणे शक्य झाले आहे. सिटी स्कॅनची सुविधा जास्तीतजास्त रु ग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्याबाबत सरकारने विचार करावा, असे ते म्हणाले.

Web Title: Private doctors should also be given insurance cover of Rs 50 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.