बदलापुरात पालिकेच्या खाजगी सुरक्षा रक्षकाची आत्महत्या, कामावर असतानाच घेतला गळफास
By पंकज पाटील | Updated: October 19, 2023 17:44 IST2023-10-19T17:44:24+5:302023-10-19T17:44:54+5:30
Badlapur News: बदलापुरात नगरपालिकेच्या खाजगी सुरक्षारक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या सुरक्षारक्षकाने बदलापुरातील बी एस यु पी प्रकल्पांवर सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असताना त्याच ठिकाणी हा गळफास घेतला आहे.

बदलापुरात पालिकेच्या खाजगी सुरक्षा रक्षकाची आत्महत्या, कामावर असतानाच घेतला गळफास
- पंकज पाटील
बदलापूर - बदलापुरात नगरपालिकेच्या खाजगी सुरक्षारक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या सुरक्षारक्षकाने बदलापुरातील बी एस यु पी प्रकल्पांवर सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असताना त्याच ठिकाणी हा गळफास घेतला आहे. बदलापूर पश्चिम भागातील बीएसयुपी प्रकल्पावर सुरक्षारक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेले नारायण लाटे यांनी आज सकाळच्या सुमारास ते कामावर आले आणि कामावर असतानाच त्यांनी इमारतीच्या तळमजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्याच कारण अजूनही अस्पष्ट आहे.तर घटनास्थळी बदलापूर पोलीस दाखल झाले असून नारायण यांचा शव बदलापूर ग्रामीण रुग्णालयांमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. नारायण हे गेल्या चार ते पाच वर्षांपासून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता अशी माहिती देखील समोर येत आहे. कामाच्या ठिकाणी त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ का आली याचा पोलीस शोध घेत आहेत