केडीएमसीच्या शाळेवर प्रिया यादवचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 06:08 PM2018-06-09T18:08:33+5:302018-06-09T18:08:33+5:30
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हिंदी माध्यमिक शाळेत प्रिया यादव हिने शालांत परीक्षेत ९१ टक्के गुणांची कमाई केली. घरची परिस्थिती प्रतिकुलअसताना केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन करणा-या प्रियाचे कौतुक केले जात आहे.
डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हिंदी माध्यमिक शाळेत प्रिया यादव हिने शालांत परीक्षेत ९१ टक्के गुणांची कमाई केली. घरची परिस्थिती प्रतिकुलअसताना केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन करणा-या प्रियाचे कौतुक केले जात आहे.
प्रियाचे वडील प्रल्हाद यादव हे पानाची टपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना केडीएमसीच्या शाळेत शिक्षणासाठी टाकले. मुलगी कुठल्या शाळेत शिकते यापेक्षा कशी शिक्षण घेते याकडे यादव दाम्पत्याने लक्ष केंद्रित केले होते. शाळा कोणतीही असो, परिश्रम घेतल्यास यश मिळते हे प्रियाने शालांत परीक्षेत दाखवून दिले. प्रियाच्या या यशामुळे तिच्या कुटुंबातील प्रत्येकाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आपल्या यशामुळे आई-वडिलांची मान उंचावल्याचे प्रिया सांगते. महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सभापती विश्वदीप पवार हे तिचे अभिनंदन करण्यासाठी घरी गेले असता तिच्या आई-वडिलांना प्रचंड आनंद झाला. पुढील शिक्षणासाठी आवश्यकता लागल्यास सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अभिनंदनासाठी शिवसेनेचे संदीप नाईक, तन्मय सारंग आदीही त्यांच्याकडे गेले होते.
* शालांत परीक्षेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेतील हिंदी माध्यमिक विद्यालयाचा ६९ टक्के निकाल लागला आहे. परीक्षेत ८२ विद्यार्थी बसले होते.त्यापैकी ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या विद्यालयाचा २२ वर्षात प्रथमच ९१ टक्के मिळवले.