पोषण आहारची माहिती इंग्रजी भाषेत भरण्याची अंगणवाडी सेविकांवर आफत; राज्यभर संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 05:28 PM2021-03-30T17:28:22+5:302021-03-30T17:29:00+5:30
Anganwadi workers : केंद्र पुरस्कृत पोषण अभियान कार्यक्रमांर्तगत गर्भवती महिला, स्तनदा माता आणि ० ते ६ वयोगटातील बालकांना पोषण आहार पुरवठा केला जात आहे.
ठाणे : गर्भवती महिला, स्तनदा माता आणि ० ते ६ वयोगटातील बालके आदींना पोषण आहार देण्यात येत आहे. या आहारच्या लाभार्थ्यांसह संबंधित माहिती ऑनलाईन इंग्रजी भाषेत नोंदण्याची आफत अंगणवाडी सेविकांवर आली आहे. इंग्रजी भाषेच्या या माहितीसाठी या अल्प शिक्षित ताईंना आता सक्ती केल्या जात असल्यामुळे त्या राज्यस्तरीय आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. (problems to Anganwadi workers for filling up nutrition information in English; Statewide outrage)
केंद्र पुरस्कृत पोषण अभियान कार्यक्रमांर्तगत गर्भवती महिला, स्तनदा माता आणि ० ते ६ वयोगटातील बालकांना पोषण आहार पुरवठा केला जात आहे. या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी व सेवांचे सनियंत्रण करण्याकरिता तंत्रज्ञानाचा वापर करुन केंद्र शासनाने माहिती संप्रेक्षण व तंत्रज्ञान आधारित पोषण ट्रॅकर या अँप्लीकेशननी निर्मिती केली आहे.
पोषण ट्रॅकर या अँप्लीकेशनमध्ये गर्भवती महिला, स्तनदा माता आणि ० ते ६ वरयोगटातील बालके यांची माहिती इंग्रजी भाषेत भरण्यााची सक्ती करण्यात आली आहे. यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. पण आदिवासी, ग्रामीण व शहरी प्रकल्पात काम करणाऱ्या बहुसंख्य अंगणवाडी सेविकांचे शिक्षण मराठी भाषेत झाले, याशिवाय काही सेविका अल्पशिक्षित आहेत. त्यांना लाभार्थ्यांची माहिती इंग्रजी भाषेत भरण्याची समस्या येत आहे.
महाराष्ट्र राज्यात शासनाची सर्व कामे मातृभाषेत केली जात आहेत. शासनाचे असे धोरण आहे की, राज्यात सर्व कामे मातृभाषेत केली पाहिजेत. मात्र अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर अँप्लीकेशनमध्ये पोषण आहारची माहिती इंग्रजी भाषेत भरण्याचे संबंधित आयुक्तालयाने आदेश जारी करुन सैनिकांना सक्ती केली आहे.
आयुक्तालयाचे हे आदेश शासनाच्या धोरणाविरुध्द राज्यातील अंगणवाडी सेवकांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघा च्या नेतृत्वाखाली राज्य प्रशासनाकडे दाद मागितली आहे. इंग्रजी भाषेत माहिती भरण्याची अट तत्काळ शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याची तयारी असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी सांगितले.
पोषण अभियानांतर्गत केंद्र शासनामार्फत विकसीत करण्यात आलेले पोषण ट्रॅकर अँप्लीकेशनमध्ये अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्याची माहिती इंग्रजीमध्ये भरण्याची करण्यात येत असलेली सक्ती बंद करून, मातृभाषेत भरण्याचे आदेश त्वरीत देण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.