महसूलमंत्र्यांकडे मांडल्या भिवंडीच्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:38 AM2021-03-28T04:38:16+5:302021-03-28T04:38:16+5:30
भिवंडी : महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे व युवा ...
भिवंडी : महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे व युवा कार्यकर्ते विरेन चोरघे यांनी गुरुवारी सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्याच्या विविध समस्यांवर चर्चा केली. यात ग्रामीण भागातील रस्ते ,पाणीटंचाई, कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली. एकेकाळी ठाणे जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र, गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात काँग्रेसला घरघर लागून काँग्रेसचा प्रभाव कमी पडला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून नागरी संपर्क वाढवून विकास कामांना प्राधान्य देऊन कार्यकर्त्यांचा हुरूप वाढवला पाहिजे, असे मत चोरघे यांनी व्यक्त केले आहे.यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ठाणे जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या विषयांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून नागरी समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील,असे आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी दिली.
===Photopath===
270321\f6a0988dfa7a4a0997ae84ef238a036c.jpg
===Caption===
दयानंद चोरघे यांनी महसूल मंत्र्यांकडे मांडल्या विविध समस्या