३०० टन कच-यावर करणार प्रक्रिया, १३५ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:59 PM2018-02-23T23:59:25+5:302018-02-23T23:59:25+5:30

ठाणे महापालिका हद्दीत निर्माण होणा-या ८०० मेट्रिक टन कच-यापैकी तब्बल ३०० टन कच-याची १३५ कोटी रुपये खर्च करून विकेंद्रीत पद्धतीने प्रक्रिया करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे

Process for 300 tons of waste, costing 135 crores | ३०० टन कच-यावर करणार प्रक्रिया, १३५ कोटी खर्च

३०० टन कच-यावर करणार प्रक्रिया, १३५ कोटी खर्च

Next

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत निर्माण होणा-या ८०० मेट्रिक टन कच-यापैकी तब्बल ३०० टन कच-याची १३५ कोटी रुपये खर्च करून विकेंद्रीत पद्धतीने प्रक्रिया करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यानुसार पहिल्या टप्यात १०० टन कचºयावर प्रक्रिया केली जाणार असून टप्प्याटप्प्याने उर्वरित प्रकल्प कार्यान्वित केले जाणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी अत्याधुनिक मशिन्सचा वापर केला जाणार असून त्यामध्येच कचºयाची विल्हेवाट लावली जाणार आहे. हा प्रकल्प स्वारस्य अभिव्यक्ती या तत्त्वावर राबविला जाणार असून या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.
महापालिका हद्दीत आजघडीला ८०० मेट्रिक कचरा रोज निर्माण होत आहे. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने सुरुवातीला डायघर येथे हालचाली सुरू केल्या होत्या. परंतु, स्थानिकांच्या विरोधामुळे पालिकेला हा प्रकल्प अद्यापही मार्गी लावता आलेला नाही. त्यानंतर तळोजा येथील सामाईक भरावभूमीतही पालिकेने सहभाग घेतला होता. परंतु ही योजनाच बारगळली आहे. त्यामुळे कचºयावर प्रक्रिया करण्याची समस्या दिवसेंदिवस जटील बनत आहे. परंतु, आता शीळ येथील वनविभागाची जागा पालिकेला प्राप्त झाली आहे. त्याठिकाणी १०० टन कचºयावर प्रक्रिया केली जाणार आहे. याशिवाय पालिकेने पाच - पाच टनाचे छोटेखानी प्रकल्प कार्यान्वितकरण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
यापुढेही जाऊन आता कचºयाची विकेंद्रीत पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

Web Title: Process for 300 tons of waste, costing 135 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.