अंतर्गत मेट्रोच्या मंजुरीची प्रक्रिया आॅक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 05:36 PM2019-01-24T17:36:21+5:302019-01-24T17:39:13+5:30

अंतर्गत मेट्रोच्या कामाला आता आणखी गती येणार असून येत्या आॅक्टोबर पर्यंत सर्व प्रकारच्या मंजुरी मिळविल्या जाणार असल्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले. तर या प्रकल्पासाठी ०.६५ ते ०.७ टक्के दराने अर्थसहाय्य मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

The process of approval of internal metro will be completed by October | अंतर्गत मेट्रोच्या मंजुरीची प्रक्रिया आॅक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

जर्मनस्थित केएफडब्लू डेव्हलपमेंट बँक आणि महाराष्ट्र मेट्रोच्या अधिका-यासोबत ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाविषयी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी चर्चा केली.

Next
ठळक मुद्देकमी दरात अर्थसहाय्य मिळविण्यासाठी प्रयत्ननिविदा प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित

ठाणे - ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अंतर्गत मेट्रोची प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर होण्याच्या दृष्टीने गुरुवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि जर्मिनस्थित केएफडब्लू डेव्हलपमेंट बँक या वित्तीय संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी, महाराष्ट्र मेट्रोचे अधिकारी यांच्यासमवेत महत्वपूर्ण चर्चा केली. या चर्चेमध्ये साधारणपणे आॅक्टोबर २०१९ पर्यंत अंतर्गत मेट्रोच्या मंजुरीची प्रक्रि या पूर्ण करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
               या बैठकीस केएफडब्लू डेव्हलपमेंट बँकेच्या दक्षिण आशिया नगर विकास आणि दळणवळण विभागाचे प्रमुख स्टिफान रिगेर, प्रकल्प व्यवस्थापिका स्टिन वोसेलर, जान प्रिब, वरिष्ठ तज्ञ स्वाती खन्ना आणि महाराष्ट्र मेट्रोचे सह महाव्यवस्थापक मनोज दंडारे आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये प्रकल्प अहवालास राज्य शासनाची मान्यता मिळविणे व त्यानंतर हा प्रकल्प अहवाल केंद्र सरकारच्या नगर विकास आणि गृहनिर्माण विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. केंद्रीय नगर विकास व गृहनिर्माण विभागातंर्गत काम करणारे पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारित काम करणाºया आर्थिक व्यवहार विभागामार्फत प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून मान्यता देणार आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या एकूण प्रकल्पाच्या २० टक्के समभागा विषयीचाही निर्णय घेण्यात येणार आहे.
केंद्र सरकारची मान्यता प्राप्त झाल्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून सदर प्रकल्प वित्तीय साहाय्यासाठी जर्मन दुतावासाकडे पाठविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केएफडब्लू डेव्हलपमेंट बँकेचे वित्तीय व प्रकल्प सल्लागार आणि तज्ज्ञ अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचा अभ्यास करून प्रत्यक्ष पाहणी करून या प्रकल्पाला ०.६५ ते ०.७ टक्के नाममात्र दराने अर्थसाहाय्य करण्याबाबत निर्णय घेणार आहेत. या बैठकीमध्ये राज्य शासन आणि केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यानंतर केएफडब्लू डेव्हलपमेंट बँकेची प्रक्रि या पूर्ण होण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे. याविषयी चर्चा करण्यात येवून साधारणपणे सर्व प्रकिया, परवानग्या आणि निविदा प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याबाबत निश्चित करण्यात आले. त्याचबरोबर महापालिका आणि केएफडब्लू डेव्हलपमेंट बँक या दोन्ही स्तरावर या प्रकल्पाची युद्धपाळीवर प्रयत्न करण्याबाबत ठरविण्यात आले.


 

Web Title: The process of approval of internal metro will be completed by October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.