भिवंडी तहसील कार्यालयासमाेर जाेरदार घाेषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:44 AM2021-08-24T04:44:51+5:302021-08-24T04:44:51+5:30

भिवंडी : ‘आदिवासी बांधव ढोर नाय, माणूस हाय माणूस हाय’, ‘जमीन आमच्या हक्काची नाय कुणाच्या बापाची’ अशा गगनभेदी ...

Proclamation in front of Bhiwandi tehsil office | भिवंडी तहसील कार्यालयासमाेर जाेरदार घाेषणाबाजी

भिवंडी तहसील कार्यालयासमाेर जाेरदार घाेषणाबाजी

Next

भिवंडी : ‘आदिवासी बांधव ढोर नाय, माणूस हाय माणूस हाय’, ‘जमीन आमच्या हक्काची नाय कुणाच्या बापाची’ अशा गगनभेदी घोषणा देत श्रमजीवी कष्टकरी आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने सोमवारी भिवंडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रेय कोलेकर यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या माेर्चात शेकडाेच्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले हाेते.

श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी हिरामण गुळवी, सागर देसक, मोतीराम नामखुडा, महेंद्र निरगुडा, आशा भोईर यांनी या माेर्चात सहभाग घेतला.

आदिम व आदिवासी व इतरांना घरकुलांचा लाभ मिळावा, आदिवासींच्या घराखालील जागा त्यांच्या नावे करावी, रोजगार हमी कायद्याप्रमाणे मागेल त्याला काम मिळावे, आदिवासी युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण आयोजित करून त्यांना कौशल्यावर आधारित रोजगार द्यावा, आदिम कातकरी समाजाला तत्काळ शिधावाटपपत्रिका द्याव्यात, शिधापत्रिकाधारकांना पुरेसे धान्य उपलब्ध करून द्यावे, गावठाण विस्तार करावा, प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा वैद्यकीय सुविधा व कर्मचारी उपलब्ध करून घ्यावेत, अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार अधिक पाटील यांना देण्यात आले. या मोर्चामुळे शहरातील कल्याण नाका ते वंजारपट्टी नाकादरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

Web Title: Proclamation in front of Bhiwandi tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.