चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या निर्मात्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:25 AM2021-07-19T04:25:26+5:302021-07-19T04:25:26+5:30
मीरारोड : चित्रपटात काम देतो, असे सांगून तरुणींना वेश्या व्यवसायास लावणाऱ्या परमानंद बालचंदानी (६८) या सी ग्रेड चित्रपट ...
मीरारोड : चित्रपटात काम देतो, असे सांगून तरुणींना वेश्या व्यवसायास लावणाऱ्या परमानंद बालचंदानी (६८) या सी ग्रेड चित्रपट निर्मात्यास मीरा रोडमधून गुरुवारी अटक करण्यात आली. त्याच्यासह अन्य दोघांना पकडण्यात आले असून, दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांना माहिती मिळाली की, मीरारोडच्या विदिशा शांतिनिकेतन इमारतीत वेश्या व्यवसाय चालवला जातो. त्या अनुषंगाने पाटील व त्यांच्या पथकातील उमेश पाटील, ढेमरे, रामचंद्र पाटील, विजय निलंगे, गावडे, शिंदे व महिला पोलीस यंबर, चव्हाण यांनी सापळा रचून कारवाई केली.
परमानंद हा तरुणींना चित्रपटात काम देतो, असे सांगून वाममार्गाला लावत असे. त्याचा निकटवर्तीय कन्हैयालालसह वनिता इंगळे, रा. चेणे ही महिला दलाल यात सहभागी होती. हे दोघे तरुणी व ग्राहक आणायचे काम करत.
परमानंद याने, ‘ये ताकत है इश्क की’, ‘बुड्ढ़ा बीघड़ गया’ हे दोन हिंदी चित्रपट बनवले असल्याचे सांगितले जाते. पीडित तरुणींचे फोटो तो ग्राहकांना व्हाॅटस्ॲपवर पाठवत होता. गेल्या १० वर्षांपासून इमारतीमधील रहिवाशांना डॉक्टर असल्याचे तो सांगत होता. अनेक तक्रारी करूनही दखल घेत नसल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले. मीरारोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.