अंबरनाथमध्ये उत्पादन शुल्कची काररवाई सुरुच: गावठी दारुसह ८४ हजारांचा ऐवज जप्त
By admin | Published: July 14, 2017 10:59 PM2017-07-14T22:59:46+5:302017-07-14T22:59:46+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाने अंबरनाथ तालुक्यातील काकडवालगावात गुरुवारी धाड टाकून दारु
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. १४ - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाने अंबरनाथ तालुक्यातील काकडवालगावात गुरुवारी धाड टाकून दारु निर्मितीच्या रसायनासह ८४ हजारांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यायत आला आहे.
गेल्या आठवडाभरापासून वेगवेगळया पथकांकडून ही कारवाई सुरु असून गुरुवारी ११ व्या दिवशीही भरारी पथकाचे निरीक्षक संजय कंगणे, दुय्यम निरीक्षक सुनिल देशमुख आणि अनिल गायकवाड आदींच्या पथकाने काकडवालगावातील एका गावठी दारुच्या अड्डयावर ही धाड टाकली. या धाडीत प्रत्येकी २०लीटरचे २०० ड्रममधून चार हजार लीटरचे रसायन तसेच इतर सामुग्री असा ऐवज या पथकाने जप्त केला. या कारवाईची चाहूल लागताच दारुचा अड्डा चालविणाऱ्यांनी मात्र तिथून पलायन केले.