बर्फाचे गोळे विकणारा बनला व्यावसायिक

By admin | Published: November 7, 2016 02:44 AM2016-11-07T02:44:00+5:302016-11-07T02:44:00+5:30

घरची परिस्थिती बेताची असल्याने शिकण्याची इच्छा असतानाही त्यांना ती पूर्ण करता आली नाही. शिक्षण अर्धवट सोडून त्याने घराला हातभार लागावा यासाठी बर्फाचे गोळे

Professional became a basketball player | बर्फाचे गोळे विकणारा बनला व्यावसायिक

बर्फाचे गोळे विकणारा बनला व्यावसायिक

Next

आसनगाव : घरची परिस्थिती बेताची असल्याने शिकण्याची इच्छा असतानाही त्यांना ती पूर्ण करता आली नाही. शिक्षण अर्धवट सोडून त्याने घराला हातभार लागावा यासाठी बर्फाचे गोळे आणि कलिंगडाच्या फोडी विकायला सुरुवात केली. त्यातून थोडेफार पैसे मिळवून वेल्डींगचा व्यवसाय सुरु केला. यात प्रगती होत आज त्याचा उद्योग सुरु केला आहे. या धडपड्या तरुणाचे नाव आहे नामदेव सोकांडे.
नामदेव यांचे बालपण खूप हालाखीत गेले. त्यांचे वडील कचरु हे ठाण्यातील एका कंपनीत रोजंदारीवर काम करत होते. नामदेव यांना एक भाऊ असून तो अपंग आहे. १९९१ मध्ये दहावी उत्तीर्ण झाले. पण घरची परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण अर्धवट सोडत त्यांनी घराला हातभार लागावा यासाठी बर्फाचे गोळे आणि कलिंगडाच्या फोडी विकायला सुरुवात केली. शहापूर तालुक्यातील खेड्यापाड्यांमध्ये जाऊन याची विक्री करायचे. यातून गाठीशी थोडा पैसा जमल्यावर वेल्डींगचा व्यवसाय सुरु केला. या व्यवसायातून पैसा मिळत असतानाच नामदेव यांचाही विकास होत होता. मग त्यांनी आटगाव औद्योगिक वसाहतीच्याबाजूला मार्बल, ग्रॅनाईट, टाईल्स याचा कारखाना व दुकान सुरु केले.

Web Title: Professional became a basketball player

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.