उल्हासनगर आरकेटी महाविध्यालायचे प्राध्यापक पगारविना, प्राध्यापकांचे पगारासाठी आंदोलन
By सदानंद नाईक | Published: December 5, 2023 07:41 PM2023-12-05T19:41:45+5:302023-12-05T19:41:56+5:30
पगार झाला नसल्याने उपासमारीची वेळ आल्याची प्रतिक्रिया प्राध्यापक यांनी देऊन पुन्हा आंदोलनाचे संकेत दिले.
उल्हासनगर: आरकेटी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा गेल्या ४ महिन्यापासून तांत्रिक कारणामुळे पगार झाला नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी महाविद्यालय प्रवेशद्वार समोर आंदोलन करून पगाराची मागणी केली. पगार झाला नसल्याने उपासमारीची वेळ आल्याची प्रतिक्रिया प्राध्यापक यांनी देऊन पुन्हा आंदोलनाचे संकेत दिले.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील आरकेटी महाविद्यालयातील प्राध्यापकांचे काही तांत्रिक कारणाने गेल्या ४ महिन्यापासून पगार झाला नसल्याने, त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. त्यांनी मंगळवारी दुपारी महाविद्यालय प्रवेशद्वार समोर एकत्र येत आंदोलन केले. पगार झाला नसल्याने, घराचे हप्ते, मुलांच्या शाळेचे शुल्क, दुकानदारांची देणी थकली असून कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याची प्रतिक्रिया यावेळी प्राध्यापकांनी दिली. प्राध्यापकांच्या आंदोलनात युनिव्हर्सिटी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. दिवाळी दरम्यान दोन महिन्याचा ७५ टक्के पगार कॉलेज प्रशासनाने दिल्याचे प्राध्यापकांचे म्हणणे आहे. प्राध्यापकांच्या आंदोलनाबाबत महाविद्यालय प्रशासना सोबत संपर्क केलाअसता झाला नाही.