पांडुरंगाच्या प्रतिष्ठापनेने जिल्हा बँकांची प्रगती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 01:48 AM2018-12-05T01:48:25+5:302018-12-05T01:48:30+5:30

राज्याचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची प्रतिष्ठापना राज्यातील सर्व जिल्हा बँकांनी मुख्य कार्यालयात करणे अपेक्षित असून पंढरीला जाण्यासाठी वारकरी, भक्तगणांना आर्थिक पाठबळ देणारी योजनाही सुरू करण्याची गरज आहे.

Progress of District Bank by the installation of Panduranga | पांडुरंगाच्या प्रतिष्ठापनेने जिल्हा बँकांची प्रगती

पांडुरंगाच्या प्रतिष्ठापनेने जिल्हा बँकांची प्रगती

googlenewsNext

- सुरेश लोखंडे 
ठाणे : राज्याचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची प्रतिष्ठापना राज्यातील सर्व जिल्हा बँकांनी मुख्य कार्यालयात करणे अपेक्षित असून पंढरीला जाण्यासाठी वारकरी, भक्तगणांना आर्थिक पाठबळ देणारी योजनाही सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे पांडुरंगाचे स्मरण होऊन बँकांची उत्तरोत्तर प्रगती होण्यास मदत होईल, असे मत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी ठाण्यात व्यक्त केले.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) मुख्य कार्यालयात विठू माऊलीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना देखमुख यांच्याहस्ते मंगळवारी करण्यात आली. त्याप्रसंगी बँकेचे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष भाऊ कुºहाडे, सीईओ भगीरथ भोईर, आमदार संजय केळकर, संचालक मंडळ, सहकार आयुक्त सतीश सोनी, विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर, डीडीआर ठाणेचे शहाजी पाटील, पालघरचे संजय राऊत आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकारी, संचालक आणि सहकार क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा बँकांसाठी उपयुक्त ठरणारे मार्गदर्शन केले.
मूर्तीमुळे बँकेत आनंदी आनंद
पांडुरंगाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यास बँकेतील रोजचे वातावरण सांप्रदायीक, आनंदी, प्रसन्न ठेवण्यास मदत होईल. पदाधिकारी आणि अधिकाºयांना पांडुरंगाचे सतत स्मरण होत राहील. यामुळे परमेश्चर कृपेने बँकेच्या कामकाजात कोणत्याही चुका होणार नाहीत. बँकेची उन्नती होईल, असे देखमुख म्हणाले. जिल्हा बँकांनी वारकरी संप्रदायासाठी आर्थिक सहकार्य करण्याची गरज आहे. भाविकांना पांडुरंगाचे दर्शन घेणे शक्य व्हावे, त्यासाठी उद्भवणारी आर्थिक चणचण दूर व्हावी, यासाठी जिल्हा बँकांनी पंढरपूर तीर्थयात्रेला जाणाºया भाविकांसाठी कर्ज योजना हाती घेऊन त्यांना आर्थिक पाठबळ देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भाविकांसाठीच्या पंढरपूर तीर्थयात्रा कर्ज योजनेमुळे बँकांची उत्तरोत्तर प्रगती होईल आणि भाविकांची वारीही पूर्ण होण्यास मदत होईल. असे ते म्हणाले.
>टीडीसी बँकेचे काम उत्तम
या दौºयाप्रसंगी त्यांनी टीडीसीसी बँकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. शेतकरी कर्जमाफीसह बचत गटांच्या कामातही टीडीसीसीची कामगिरी उत्तम असल्याचे त्यांनी नमूद केले. ठेवीच्या तुलनेत बँकांनीकर्जांचे अधिकाधिक वितरण करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. याप्रसंगी अन्य पदाधिकाºयांसह वरिष्ठ अधिकाºयांशी सहकारच्या विविध विषयांवर त्यांनी यावेळी चर्चा केली.

Web Title: Progress of District Bank by the installation of Panduranga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.