सभा तहकुबीचा अधिकारी करणार निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:25 AM2018-02-20T01:25:41+5:302018-02-20T01:26:02+5:30
पोलिसांना गस्तीसाठी रॉयल एनफिल्ड गाड्या देण्याच्या मुद्द्यावरून भाजपा आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष चिघळला आहे.
ठाणे : पोलिसांना गस्तीसाठी रॉयल एनफिल्ड गाड्या देण्याच्या मुद्द्यावरून भाजपा आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष चिघळला आहे. प्रशासनाचा हा प्रस्ताव नामंजूर झाला असतानाही तो तहकूब केल्याचे भासवत मंगळवारी तो पुन्हा महासभेत मंजुरीसाठी मांडण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. त्या निषेधार्थ भाजपाने आणलेल्या सभा तहकुबीला विरोध करण्यासाठी अधिकारी काळ्या फिती लावून सभागृहात जाणार आहेत. मात्र हा प्रकार म्हणजे सभागृहाला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार असल्याचे सांगत लोकप्रतिनिधींनीही या घटनेचा निषेध नोंदवल्याने महासभेत हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.
पोलिसांशी एकोप्यातून पालिकेने पोलिसांना गस्तीसाठी १५ रॉयल एनफिल्ड गाड्या देण्याचा प्रस्ताव मांडला. तो महासभेने नामंजूर केला, तो तहकूब झाल्याचे कारण देत प्रशासनाने आयुक्तांच्या अधिकारात या गाड्या देण्याचा निर्णय घेतला. हा प्रस्ताव मंगळवारच्या महासभेत येणार आहे. या मुद्यावरून भाजपाचे गटनेते आक्रमक झाले असून त्यांनी प्रशासनाच्या या प्रकाराविरोधात सभा तहकुबी मांडली आहे. रात्रंदिवस तर शहरासाठी काम करूनही एखाद्या लोकप्रतिनिधीकडून अवमान केला जात असेल, तर काम कसे करायचे, असा सवाल अधिकाºयांनी केला आहे.