ठाणे जिल्ह्यात मनाई आदेश लागू: मराठा संघटनांनाही आंदोलनाला बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 11:36 PM2021-06-23T23:36:17+5:302021-06-23T23:37:07+5:30

ठाणे जिल्हयात सध्या कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला तसेच चार पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्याला बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचा मनाई आदेश ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बुधवारी जारी केले आहेत.

Prohibition order imposed in Thane district: Maratha organizations also banned from agitation | ठाणे जिल्ह्यात मनाई आदेश लागू: मराठा संघटनांनाही आंदोलनाला बंदी

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Next
ठळक मुद्दे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मराठा आरक्षणाबाबतची याचिका न्यायालयाने रद्द केल्याने मराठा संघटनांकडून आंदोलन होण्याची शक्यता तसेच कोरोना या संसंर्गजन्य आजाराची रु ग्ण संख्या लक्षात घेता ठाणे जिल्हयात सध्या कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला तसेच चार पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्याला बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचा मनाई आदेश ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बुधवारी जारी केले आहेत.
ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात शांतता तसेचव कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, समाजकंटक आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे सोयीचे व्हावे, यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार ११ जून ते २६ जून या कालावधीत हा आदेश लागू राहणार आहे. या आदेशानुसार कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगणे, विक्री किंवा साठा करण्याला बंदी आहे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे. चिथावणीखोर भाषणे देणे तसेच पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास बंदी आहे. अंत्ययात्रा, विवाह मिरवणूक तसेच लेखी परवानग्या घेऊन काढलेल्या मिरवणूकीस हा आदेश लागू राहणार नसल्याचेही या आदेशात म्हटले आहे.

Web Title: Prohibition order imposed in Thane district: Maratha organizations also banned from agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.