ग्रामीण ठाणे जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत मनाई आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:40 AM2021-03-20T04:40:58+5:302021-03-20T04:40:58+5:30

ठाणो : कोरोनाची पाश्वभूमी लक्षात घेता येत्या काही दिवसांत जिल्ह्यात होळी व रंगपंचमी सण साजरा करण्यात येणार आहे. ...

Prohibition order till 5th April in rural Thane district | ग्रामीण ठाणे जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत मनाई आदेश

ग्रामीण ठाणे जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत मनाई आदेश

Next

ठाणो : कोरोनाची पाश्वभूमी लक्षात घेता येत्या काही दिवसांत जिल्ह्यात होळी व रंगपंचमी सण साजरा करण्यात येणार आहे. या दरम्यान लोकांना कोणताही त्रास, अडथळा, दुखापत जीवितास, आरोग्यास धोका अथवा शांततेस बाधा, दंगा, मारामारी होऊ नये व त्यास प्रतिबंध व्हावा. साजरे होणारे सण, उत्सव शांतते पार पाडावेत व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी या दृष्टीने २२ मार्च ते ५ एप्रिल मध्यरात्रीपर्यंत ठाणे ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश राहणार असल्याचे राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले

होळी २८मार्च, २९ मार्च रोजी धुलीवंदन व २ एप्रिल रोजी रंगपंचमी हे सण साजरे होणार आहेत. होळी पेटविण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकूड वापरले जाते. तसेच धुलीवंदन व रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंग, पाणी, चिखल मिश्रित पाणी उडवतात. त्याआनुषंगाने आरोग्यास अपायकारक होईल, अशा रासायनिक रंगांचा वापर करणे. रंगाचे फुगे, पाण्याचे फुगे अथवा इतर द्रव पदार्थाचे फुगे अथवा प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करून फेकल्यामुळे आरोग्यास अपाय व जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करणे. सार्वजनिक जागेत अश्लील शब्द उच्चारणे, घोषणा देणे, अश्लील गाणी गाणे. सार्वजनिक जागेत विकृत हावभाव करणे किंवा वाकुल्या व विडंबनचे प्रदर्शन करणे किंवा चित्नेप्रतिकृती अथवा कोणत्याही वस्तुंचे अथवा उद्देशाचे की, ज्यामुळे एखाद्याची प्रतिष्ठा, योग्यता व नैतिकतेला धक्का पोहचेल यास आळा घालण्यासाठी हा मनाई आदेश जिल्ह्यात जारी केला आहे.

Web Title: Prohibition order till 5th April in rural Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.