समाजमाध्यमांद्वारे केलेल्या तक्रारींचा तातडीने निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:27 AM2021-06-17T04:27:39+5:302021-06-17T04:27:39+5:30

ठाणे : ठाणे शहरातील नागरिकांचा महापालिकेच्या कामात सहभाग असावा, यासाठी महापालिकेने केलेल्या नालेसफाईच्या कामात काही त्रुटी असतील ...

Prompt disposal of complaints made through social media | समाजमाध्यमांद्वारे केलेल्या तक्रारींचा तातडीने निपटारा

समाजमाध्यमांद्वारे केलेल्या तक्रारींचा तातडीने निपटारा

Next

ठाणे : ठाणे शहरातील नागरिकांचा महापालिकेच्या कामात सहभाग असावा, यासाठी महापालिकेने केलेल्या नालेसफाईच्या कामात काही त्रुटी असतील त्या थेट महापौरांना कळवाव्यात, त्यांची तातडीने दखल घेतली जाईल, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी नागरिकांना केले होते, त्यांच्या या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महापौरांनी निर्देश दिल्याप्रमाणे प्रशासनानेसुद्धा नागरिकांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून केलेल्या तक्रारींचा निपटारा ताबडतोब केल्याने त्यांनी प्रशासनाचे कौतुक करून आभार व्यक्त केले आहेत.

मुंब्रा, कळवा तसेच ठाणे शहरातील नागरिकांनी आपल्या विभागातील नालेसफाई समाधानकारक न झाल्याचे फोटो हे महापौरांना व्हॉट्सॲपद्वारे पाठविले. या तक्रारी, फोटो हे त्याच दिवशी संबंधित विभागाकडे महापौर कार्यालयाने पाठविले. प्रशासनानेही तातडीने दखल घेऊन ज्या ठिकाणची तक्रार आहे, त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून तेथील साफसफाई केली, नालेसफाई करणाऱ्या ठेकेदाराशी संपर्क साधून पुन्हा नाल्याची साफसफाई करून घेतली. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतल्याबद्दल झालेल्या साफसफाईचे फोटो नागरिकांनी पुन्हा महापौरांना पाठवून त्यांचे आभार व्यक्त केले.

नालेसफाई प्रशासनामार्फत केल्यानंतरसुद्धा काही नागरिक हे आपल्या घरातील टाकाऊ वस्तू, फर्निचर या वस्तू नाल्यात टाकून आपली स्वत:ची जबाबदारी झटकून प्रशासनाला दोष देत असतात, त्यामुळेच मी थेट नागरिकांना आवाहन करून आपणच आपल्या प्रभागातील न झालेल्या नालेसफाईचे फोटो पाठविण्याचे आवाहन केले. एक जबाबदार नागरिक म्हणून नागरिकांनी जो प्रतिसाद दिला, त्या सर्वांचे आभार महापौरांनी व्यक्त केले आहेत. तसेच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीदेखील तातडीने दखल घेतली. त्याबद्दल उपायुक्त अशोक बुरपल्ले, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर, घनकचरा विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष वझरकर, आपत्कालीन विभागाचे संतोष कदम यांचे आभार व्यक्त केले आहेत.

पावसाळा सुरू असून, या काळात एखादी आपत्कालीन परिस्थ‍िती उद्भवल्यास नागरिकांनी ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन विभागाशी ०२२२५३७१०१० या दूरध्वनी क्रमांकावर तसेच १८००२२२१०८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: Prompt disposal of complaints made through social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.