५०० फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 01:47 AM2020-02-21T01:47:10+5:302020-02-21T01:47:21+5:30
ठराव मंजूर : आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष
उल्हासनगर : मुंबई पालिकेच्या धर्तीवर ५०० फुटाच्या आतील घरांना मालमत्ता कर माफ करण्याच्या ठरावाला गुरूवारी झालेल्या महासभेत मान्यता देण्यात आली. याबाबत महापालिका आयुक्त त्याला मान्यता देतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौर लिलाबाई अशान यांनी विकासकामांना गती देण्यासाठी एका आठवडयात दोन वेळा महासभा बोलावली.
सोमवारी १७ फेबु्रवारी रोजी बोलावलेल्या महासभेत कुठलेही काम न होता नगरसेवकांच्या आग्रहाखातर पिठासीन अधिकाऱ्यांनी महासभा स्थगित केली. गुरूवारी पुन्हा महासभा बोलावल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.
सभागृहनेते राजेंद्र चौधरी यांनी आणलेल्या ५०० फुटाच्या आतील घरांना मालमत्ता कर माफ करण्याच्या ठरावाला मान्यता दिली. तर नावात बदल या विषयावर फक्त चर्चा झाली. तर कचºयाच्या प्रस्तावावर भाजप नगरसेवक एकमेकात भिडले.
आर्थिक संकटात सापडलेल्या पालिकेला यातून बाहेर काढण्यासाठी एकत्र येण्याऐवजी सत्ताधारी व विरोधी पक्ष आमने-सामने येत आहेत. याचा परिणाम शहर विकासावर झाल्याची टीका होत आहे.
मनसेने दिले निवेदन
स्थायी समिती सभापतींना सादर केलेल्या अंदाजपत्रकात दुप्पट पाणीपट्टी दरवाढ दर्शविली आहे. अनेक भागात दिवसाआड पाणी येत असल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष बंडु देशमुख यांनी केला आहे. या विभागाच्या सावळ््यागोंधळामुळे पाणीपट्टीत वाढ करू नये, असे निवेदन दिले.