६१ रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:47 AM2021-09-04T04:47:29+5:302021-09-04T04:47:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि विनालायसन्स वाहने चालवणाऱ्या ६१ रिक्षाचालक व मालकांचे लायसन्स रद्द करण्याचा ...

Proposal to revoke the license of 61 autorickshaw drivers | ६१ रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव

६१ रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि विनालायसन्स वाहने चालवणाऱ्या ६१ रिक्षाचालक व मालकांचे लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव डोंबिवली वाहतूक पोलिसांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण विभागाला पाठवला आहे. शहरातील बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी ही माहिती दिली.

कोविडच्या कडक निर्बंध काळात कारवाई बंद होती. मात्र, त्यानंतर जसे निर्बंध शिथिल झाले तसतशी कारवाई सुरू झाली आहे. चार महिन्यांत ६१ जणांवर लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव आरटीओ विभागाकडे गेल्यावर त्याला मंजुरी मिळत असल्याचेही गित्ते म्हणाले.

जर त्या प्रस्तावांवर कारवाई झाली तर मात्र सहा महिन्यांपर्यंत लायसन्स रद्द होऊ शकते, अशी त्यात तरतूद आहे. त्यामुळे शक्यतोवर ही कारवाई नियम न पाळण्यासंदर्भात फार टोक गाठले तर केली जाते, तोपर्यंत संबंधिताला समज देऊन नियमांचे पालन करण्यासंदर्भात सांगितले जाते; पण त्यानंतरही नियमांचे पालन न केल्यास अशी कारवाई केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

---------------

Web Title: Proposal to revoke the license of 61 autorickshaw drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.