वृक्ष प्राधिकरण विभागाच्या पटलावर ४६० वृक्ष तोडीचे प्रस्ताव, पुनर्रोपणाचा मार्ग मात्र खडतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 05:40 PM2019-02-27T17:40:41+5:302019-02-27T17:42:32+5:30
ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे पुन्हा एकदा ४६० वृक्ष तोडीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आले आहेत. परंतु आधीच्याच वृक्ष तोडीच्या बदल्यात पुनर्रोपण करण्यात अडचणी असतांना आता ४६० वृक्षांच्या बदल्यात २३०० वृक्षांचे पुनर्रोपण कसे केले जाणार हा मोठा प्रश्न या विभागाला सतावू लागला आहे.
ठाणे - ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे वृक्षतोडीचे चार प्रस्ताव दाखल झाले असून यामध्ये जवळपास ४६० वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. तर दुसरीकडे पुनर्रोपणाच्या नावाखाली वृक्ष तोडीला परवानगी देण्यात येत असली तरी आधीच ३ हजारांपेक्षा अधिक झाडांच्या पुनर्रोपणाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना आता आणखी ४६० झाडांची भर पडली असल्याने त्याच्या बदल्यात नवीन झाडे लावायची कुठे याबाबत अद्याप पालिका प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही.
कौसा येथील जोडरस्त्यांच्या कामांमध्ये जवळपास २,८७४ कोपरी रु ंदीकरणाच्या कामात २४२ तर मेट्रोच्या कामात १ हजारांपेक्षा अधिक झाडांची कत्तल होणार आहे. ही झाडे लावायची कुठे याबाबत अजूनही पालिका प्रशासनाचे निश्चित धोरण ठरलेले नाही. कौसा जोडरस्त्याच्या कामांमध्ये बाधित होणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण करायचे की आणखी काय करायचे याबाबत देखील वृक्ष प्राधिकरण विभागामध्ये एकमत झालेले नाही. त्यामुळे ही सर्व झाडे लावायची कुठे हा तिढा सुटलेला नसताना आता तब्बल ४६० वृक्ष तोडीचा प्रस्ताव विकासकांच्या मध्यातून वृक्ष प्राधिकरण विभागाकडे दाखल झाले आहेत. दिवा प्रभाग समितीच्या हद्दीमधील तीन रस्त्यांचे बांधकाम केले जाणार आहे. कल्याण फाटा दत्तमंदिर ते २५ मीटर डीपी रस्त्यांपर्यंत ३० मीटर रु ंद डीपी रस्त्याचे काम केले जाणार आहे. दुसरा कल्याण शीळ रस्त्यापासून घनकचरा प्रक्रि या केंद्राकरीत राखीव असणाऱ्या भूखंडाकडे जाणाºया २५ मीटर रुंद डीपी रस्ता तर तिसरा मिनार रेसिडेन्सी ते कल्याण शीळ रोडपर्यंत २५ आणि ४५ मीटर रु ंद डीपी रस्ता अशा तीन रस्त्यांमध्ये ३२३ वृक्ष बाधित होणार असून त्या झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे तर ४८ वृक्ष तोडले जाणार आहे.
दुसरा प्रस्ताव मे. ओंमकार डेव्हलपर्स यांच्याकडून वृक्ष प्राधिकरण विभागाकडे आला असून यामध्ये २० वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. शीळ येथील सेक्टर ११ सर्व्हे नं २८ या ठिकाणी विकास करण्याचा हा प्रस्ताव आहे. तिसरा प्रस्ताव माजिवडा येथील मे. डिझाईन कन्सोटीयन यांच्याकडून आला असून या विकास कामांमध्ये जवळपास ११ वृक्षांचे पुनर्रोपण तर २ वृक्ष तोडली जाणार आहे. चौथा प्रस्ताव रेमंड कंपनीकडून दाखल करण्यात आला असून यामध्ये ४५ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असून ६ झाडे तोडली जाणार आहे. वर्तकनगर नं १ येथील सेक्टर ४ मध्ये ३० मीटर रुंद आणि ४५० मीटर लांब रस्त्यांच्या बांधकामांसाठी हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण विभागाकडे सादर करण्यात आला आहे. तर माजिवडा येथे एक धोकादायक वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव दाखल झाला असून असे एकूण तब्बल ४६० झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. परंतु आधीच्याच तोडण्यात येणाºया वृक्षांच्या पुनर्रोपणचा मार्ग खडतर असतांना या वृक्षांचे पुनर्रोपण कशा पध्दतीने केले जाणार हा मोठा प्रश्न वृक्ष प्राधिकरण विभागाला पडला आहे. एका झाडाच्या मोबदल्यात पाच नवीन वृक्ष लागवड करणे असे धोरण आहे. त्यानुसार ४६० वृक्षांच्या बदल्यात २३०० वृक्ष लावावे लागणार आहेत.