भंडार्लीतील ठामपाच्या प्रस्तावित कचराभूमीला मनसेचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:44 AM2021-09-22T04:44:59+5:302021-09-22T04:44:59+5:30

कल्याण : कल्याण ग्रामीणमधील १४ गावांमधील मौजे भंडार्ली गावात ठाणे महापालिकेचा प्रस्तावित कचराभूमी प्रकल्प रद्द करा, अशी मागणी करून ...

The proposed landfill of Thampa in Bhandarli | भंडार्लीतील ठामपाच्या प्रस्तावित कचराभूमीला मनसेचा खो

भंडार्लीतील ठामपाच्या प्रस्तावित कचराभूमीला मनसेचा खो

Next

कल्याण : कल्याण ग्रामीणमधील १४ गावांमधील मौजे भंडार्ली गावात ठाणे महापालिकेचा प्रस्तावित कचराभूमी प्रकल्प रद्द करा, अशी मागणी करून मनसे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र दिले आहे.

याबाबत पाटील यांनी सांगितले की, ठाणे शहरातील कचरा १४ गावांमधील मौजे भंडार्ली येथे टाकण्यासाठी चार हेक्टर जागा ठाणे महानगरपालिकेने भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला असून, त्याला भंडार्ली ग्रामस्थांसह १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीने विरोध केला आहे. आधीच १४ गावांमध्ये प्रदूषणाची समस्या असताना ठाणे महानगरपालिका आपला दैनंदिन कचरा जबरदस्तीने या गावांच्या माथी मारत असल्याने सर्व गावातील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

स्थानिकांचा आहे विरोध

वास्तविक १४ गावे ठाणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट नसून ग्रामपंचायती आहेत. तसेच आपली गावे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करावीत, यासाठी गेली अनेक वर्षे संघर्ष सुरू असून, तसा ग्रामपंचायतींनी ठराव करून शासनास सादर केला आहे. याच भूमिकेतून सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सर्वपक्षीय बहिष्कार घातला आहे. आधीच या सर्व गावांना अनधिकृत केमिकल गोदामांनी घेरले असून, रासायनिक पदार्थांच्या साठ्यांमुळे नदी, नाले, जमिनी प्रदूषित झाल्या आहेत. गावात पिण्यायोग्य पाणी उपलब्ध नाही, आरोग्य सुविधासुद्धा नाहीत. त्यात आता कचराभूमीची भर पडल्यास प्रदूषण अधिक वाढणार आहे. अनधिकृत गोदामांवर कारवाई करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करून कचराभूमी प्रकल्प मात्र कुणालाही विश्वासात न घेता लादण्यात येत आहे.

ठामपाला कानपिचक्या

ठाणे महानगरपालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी शून्य कचरा मोहीम प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता आहे. ठिकठिकाणी प्लान्ट उभारून कचऱ्याची विल्हेवाट त्याच ठिकाणी लावल्यास अशाप्रकारे कचराभूमी उभारण्याची गरज भासणार नाही व दिव्यासह सर्वच भाग डम्पिंगमुक्त, कचरामुक्त होईल, जनभावना लक्षात घेऊन आधीच प्रदूषणग्रस्त असलेल्या १४ गावांमधील भंडार्ली येथील प्रस्तावित कचराभूमी प्रकल्प तातडीने रद्द करावा, असे पाटील यांनी सांगितले.

----------------------

Web Title: The proposed landfill of Thampa in Bhandarli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.