बोगस भूसंपादनातून धनदांडग्यांची ‘समृद्धी’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 12:05 AM2018-12-04T00:05:01+5:302018-12-04T00:05:12+5:30

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनींची खरेदी बनावट कागदपत्रांनी करून शेतक-यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा आरोप करून भिवंडीसह शहापूर आणि कल्याण येथील शेतकरी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

'Prosperity' of rich people from bogus land acquisition | बोगस भूसंपादनातून धनदांडग्यांची ‘समृद्धी’

बोगस भूसंपादनातून धनदांडग्यांची ‘समृद्धी’

Next

ठाणे : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनींची खरेदी बनावट कागदपत्रांनी करून शेतक-यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा आरोप करून भिवंडीसह शहापूर आणि कल्याण येथील शेतकरी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत विभागाकडून चौकशी केली, तर धनदांडग्यांनी बनावट कागदपत्रांद्वारे आपली कोट्यवधींची समृद्धी कशी केली, याचा घोटाळा उघडकीस येईल, असा दावा उपोषणकर्त्यांनी केला.
शासकीय विश्रामगृहासमोर या शेतकºयांनी उपोषण सुरू केले आहे. समृद्धी महामार्गातील भ्रष्टाचाराविरोधात, शेतकºयांच्या झालेल्या बेकायदेशीर खरेदीखत, संबंधित अधिकाºयांकडून होणारी मुजोरी व फसवणूक बाधित शेतकºयांवर बेकायदेशीर दाखल झालेल्या गुन्ह्यांविरोधात जिल्ह्यातील समृद्धीत बाधित शेतकºयांच्या न्याय्य हक्कासाठी हे बेमुदत उपोषण सुरू केल्याचे या शेतकºयांनी सांगितले. या उपोषणाची त्वरित दखल घेऊन संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी या उपोषणकर्त्यांना आमदार किसन कथोरे यांनीदेखील भेट दिली. या व्यासपीठावर धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांच्यासह फसवणूक झालेले शेतकरी व समाज कार्यकर्त्यांनीदेखील या उपोषणात सहभाग घेतला.
शेतकºयांची फसवणूक झाल्याची अधिकाºयांकडे तक्रार करूनही न्याय मिळालेला नाही. मात्र, अधिकाºयांच्या दलालांकडून छळवणूक सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकºयांच्या जीवितास धोका निर्माण झालेला असतानाही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचे या भिवंडी येथील कैलास ढमणे यांनी सांगितले. आमच्या ढमणे परिवारासह जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, कल्याण येथील फसवणूक झालेले शेतकरीदेखील या बेमुदत उपोषणात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकाºयांनी याप्रकरणी चौकशी करुन कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सोमवारी उशिरा उपोषण स्थगित करण्यात आले.
>भूसंपादन अधिकाºयासह तहसीलदारांची चौकशी हवी
समृद्धी मार्गात बाधित झालेल्या घरांचा मोबदला त्वरित देण्यात यावा, चिराडपाड्यात काही बेकायदेशीर केलेले जमिनीचे खरेदीखत रद्द करावे, विशेष भूसंपादन अधिकारी, कम्युनिकेटर प्रकाश गायकर, निलेश भोईर व इतर यांचे व त्यांच्या नातेवाइकांच्या सर्व आर्थिक व्यवहारांची स्वायत्त यंत्रणेमार्फत चौकशी करावी. भिवंडी आणि शहापूर तहसीलदारांची खोट्या व बोगस खरेदीखतप्रकरणी लाचलुचपत विभागाकडून चौकशी करण्याची मागणीदेखील या उपोषणाच्या माध्यमातून या शेतकºयांनी केली आहे

Web Title: 'Prosperity' of rich people from bogus land acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.