भिवंडीत देहव्यापार करणाऱ्या महिलेची प्रियकराने केली हत्या

By नितीन पंडित | Published: September 24, 2022 05:36 PM2022-09-24T17:36:55+5:302022-09-24T17:37:15+5:30

भिवंडी शहरातील हनुमान टेकडी येथे देह व्यापार करणाऱ्या महिलेची शास्त्री नगर येथील इमारतीत तिच्या सोबत राहणाऱ्या प्रियकराने हत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली आहे.

Prostitute woman killed by boyfriend in Bhiwandi | भिवंडीत देहव्यापार करणाऱ्या महिलेची प्रियकराने केली हत्या

भिवंडीत देहव्यापार करणाऱ्या महिलेची प्रियकराने केली हत्या

Next

भिवंडी :

दि.२४-भिवंडी शहरातील हनुमान टेकडी येथे देह व्यापार करणाऱ्या महिलेची शास्त्री नगर येथील इमारतीत तिच्या सोबत राहणाऱ्या प्रियकराने हत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली आहे. कविता रामप्पा मादर उर्फ मुस्कान सद्दाम सय्यद वय २४ असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.कविताचे शास्त्रीनगर परिसरात राहणाऱ्या सद्दाम शरिफ सय्यद वय ३० याच्यासोबत प्रेम संबंध असल्याने ते एकत्र राहत होते.

हनुमान टेकडी परिसरात पोलीस कारवाई होणार असल्याचे अफवेने येथील महिला रात्री या वस्तीतून बाहेर निघून जात असल्याने कविता सद्दाम सोबत त्याच्या शास्त्रीनगर येथील गुलशन अपार्टमेंट या इमारती मधील फ्लॅट मध्ये रात्री राहण्यास गेली होती.या वेळी दोघे बेडरूम मध्ये असतांना त्यांच्यात झालेल्या वादावरून सद्दाम याने कविता हीची गळा व तोंड दाबुन हत्या केली.

२२ सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास कविताची हत्या केल्या नंतर सद्दामने विजापूर येथील कविता हिच्या आजीस तिने आत्महत्या केल्याचे सांगत मृतदेह गावी घेऊन येत असल्याचे सांगितले.त्यानुसार रुग्णवाहिकेत मृतदेह घेऊन सद्दाम गावी जाण्यास निघाला.परंतु सकाळी कविता वस्तीत न आल्याने तिच्या बद्दल इतर महिलांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना संशय वाटला.महिलांनी या बाबत शहर पोलीस ठाण्यास माहिती दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस पथकांना कामाला लावून रुग्णवाहिका व तिच्या चालकाचा शोध घेत रुग्णवाहिका पुणे परिसरातून जात असल्याचे समजल्याने पोलिसांनी पुणे नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून रुग्णवाहिका महामार्गावर नाकाबंदी करीत थांबविली.त्यांनतर रुग्णवाहिकेतील मृतदेहाचे पुणे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केले.त्यामध्ये गळा आवळून हत्या झाल्याचे निष्पन्न झाले.तो पर्यंत भिवंडी शहर पोलीस पथक पुणे येथे दाखल होत सद्दाम यास ताब्यात घेत मृतदेह भिवंडी येथे घेऊन आले.पोलिसांनी दिलेल्या फिर्यादी वरून कविता हिच्या हत्येचा गुन्हा दाखल करीत प्रियकर सद्दाम शरिफ सय्यद यास अटक केली असल्याची माहिती शनिवारी शहर पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Prostitute woman killed by boyfriend in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.