भिवंडीतील वारांगनांना मिळाली जगण्याची दिशा, महिलांना दिला जातो पौष्टिक आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 12:38 AM2020-06-26T00:38:51+5:302020-06-26T00:38:56+5:30
तहसीलदार व उद्योगपतींच्या माध्यमातून अगरबत्ती पॅकिंगचे काम मिळाले.
नितीन पंडित
भिवंडी : भिवंडीतील देहविक्रय करणाऱ्या महिलांची वस्ती असलेली हनुमान टेकडी परिसर म्हणजे जणूकाही बदनाम वस्ती. या बदनाम वस्तीत नेहमी गिºहाइकाच्या शोधात भिरभिरणाºया नजरांनी खुणावणारे हात आता अगरबत्ती पॅकिंग करण्यात गुंतले आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी येथील महिलांसाठी काम करणाºया श्री साई सेवा संस्थेच्या प्रमुख स्वाती खान यांच्या पुढाकाराने लॉकडाऊन काळात देहविक्रय न करण्याची शपथ घेतली. पण लॉकडाऊन वाढल्याने यांची चिंता वाढली. तेव्हा त्यांनी आपली व्यथा खान यांच्यापुढे मांडली. त्यांनी तहसीलदार व उद्योगपतींच्या माध्यमातून अगरबत्ती पॅकिंगचे काम मिळाले.
अनेक सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून येथील ५६५ महिलांना वेळोवेळी अन्नधान्य, इतर जीवनावश्यक साहित्याचे वितरण झाले. परंतु लॉकडाऊन वाढत गेला तशी येथील महिलांची तगमग वाढली. दोनवेळचे जेवण मिळते. पण इतर खर्चासाठी, घरभाड्यासाठी कुणाकडे हात पसरणार या वेदनेतून महिलांनी आम्हाला काम पाहिजे, यासाठी तगादा लावला होता.
खान यांनी प्रयत्न करुन या महिलांना अगरबत्ती पॅकिंगचे काम मिळवून दिले. येथील काम करण्यास उत्सुक असलेल्या २५ महिलांची प्रथम यासाठी निवड करून त्यांना १५ दिवसांचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर अगरबत्ती पॅकिंगचे काम मिळाले. या प्रशिक्षण कालावधीत महिलांना २१० रुपये प्रतिदिन मानधन स्वरूपात दिले. सायंकाळी महिलांना हळददूध व उकडलेले अंडे असा पौष्टिक आहार दिला जातो. त्यांना प्राणायामचे धडे दिले जातात.
>मुलांनाही स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण : लॉकडाऊनच्या काळात आम्हाला संस्थेच्या माध्यमातून अन्नधान्य मुबलक मिळाले. पण या कामाने आमची पैशांची नड दूर झाली असून हे काम असेच सुरु राहिले तर आपण देहविक्रीच्या व्यवसायातूनही बाहेर पडू, असा विश्वास देहविक्रय करणाºया एका महिलेने बोलून दाखविला . येथील देहविक्रय करणाºया महिलांसोबत त्यांच्या मुलांनाही स्वयंरोजगार करता यावा, यासाठी सध्या दिवे बनवणे, तोरण बनविण्याचे प्रशिक्षण दिले जात असून या सर्व कामांतून जगण्याची नवी ऊर्जा मिळत असल्याचे महिलांनी बोलून दाखविले.