भाईंदरच्या भर वसाहतीतील लॉजमध्ये वेश्या व्यवसाय, चौघांना अटक
By धीरज परब | Published: May 6, 2024 09:04 PM2024-05-06T21:04:10+5:302024-05-06T21:04:36+5:30
मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या गोडदेव - अभिनव शाळे जवळच्या नाक्यावर असलेल्या आश्रय ह्या भर वस्तीतील लॉजमधून वेश्या व्यवसाय चालत ...
मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या गोडदेव - अभिनव शाळे जवळच्या नाक्यावर असलेल्या आश्रय ह्या भर वस्तीतील लॉजमधून वेश्या व्यवसाय चालत होता. सदर लॉज वरील छाप्यातून एका तरुणीची सुटका करत चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
भाईंदर पूर्वेचा भर वस्तीतील शीतल स्मृती इमारतील्या ह्या लॉज मधून वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष ला मिळाली . पोलीस निरीक्षक समीर अहिरराव व उपनिरीक्षक तुषार माळोदे सह उमेश पाटील , शिवाजी पाटील , केशव शिंदे , अश्विनी भिलारे , शीतल जाधव , जी . व्ही . जावळे, एस . एस . सातकर आदी पोलिसांनी बोगस गिर्हाईक पाठवून सापळा रचला . पोलिसांनी पाठवलेल्या बोगस गिर्हाईक कडून वेश्यागमना साठी ३ हजार रुपयात मुलगी आणि खोलीचे भाडे असे लॉज मध्ये घेण्यात आले.
पैश्यांच्या बदल्यात तरुणीला आणल्या नंतर सापळा रचून बसलेल्या पोलीस पथकाने छापा टाकून लॉजचा व्यवस्थापक महेश रामधनी यादव (५६ ) सह वेटर राजेश रोहन प्रसाद (३३ ), जानाई नजेनुद्दीन मलिक (४९ ) आणि दिपककुमार होरील यादव (२८ ) ह्या तिघांना अटक केली .
या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात रविवारी ५ मे रोजी पिटा कायद्यासह भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्यात अटक चौघांसह लॉज चा चालक व मालक यांच्या देखील आरोपित समावेश आहे .