मसाजपार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय
By Admin | Published: January 24, 2017 05:19 AM2017-01-24T05:19:10+5:302017-01-24T05:19:10+5:30
मसाज पार्लरच्या नावाखाली वसईतील उच्चभ्रू सोसायटीत चालणारा वेश्या व्यवसाय पोलीसांनी उघडकीस आणला असून, दोन महिलांना
विरार : मसाज पार्लरच्या नावाखाली वसईतील उच्चभ्रू सोसायटीत चालणारा वेश्या व्यवसाय पोलीसांनी उघडकीस आणला असून, दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. तर सहा मुलींची सुटका करण्यात आली आहे.
वसईच्या पश्चिमेकडील ओमनगर येथील न्यू स्टार आणि मानव मंदिर येथील सिल्वर युनीसेक्स सलूनमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार माणिकपुरचे पोलीस निरिक्षक अनिल पाटील आणि वसईचे पोलीस निरिक्षक संपत पाटील यांनी बोगस ग्राहक पाठवून खात्री केली. खात्री पटल्यानंतर या दोन्ही पोलीस ठाण्यांनी संयुक्तरित्या कारवाई करून छापा मारला. या छाप्यात न्यू स्टार पार्लर चालवणारी दिलशाद अब्दुल गदर आणि सिल्वर युनीसेक्स चालवणारी सावित्री खन्ना या दोघींनी अटक करण्यात आली. तर या ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या सहा मुलींची सुटका करण्यात आली. (वार्ताहर)