आपले संगणक सुरक्षित राखणे हे डिजीटल युगासाठी सुरक्षीत आहे - डॉ. आल्हाद आपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 03:54 PM2018-02-21T15:54:18+5:302018-02-21T15:58:19+5:30

ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. आल्हाद आपटे यांनी ‘डिजीटल जग व सायबर सुरक्षा’ या विषयावर उपस्थितांना अभ्यासपूर्ण माहिती देऊन मार्गदर्शन केले.

Protecting your computer is safe for a digital era - Dr. Alhad Apte | आपले संगणक सुरक्षित राखणे हे डिजीटल युगासाठी सुरक्षीत आहे - डॉ. आल्हाद आपटे

आपले संगणक सुरक्षित राखणे हे डिजीटल युगासाठी सुरक्षीत आहे - डॉ. आल्हाद आपटे

Next
ठळक मुद्दे ‘डिजीटल जग व सायबर सुरक्षा’ या विषयावर मार्गदर्शनमोबाईलमध्ये अधिकृतच अ‍ॅप्स घ्यावे - डॉ. आल्हाद आपटेसी.डी. देशमुख - दिलीप महाजन स्मृती व्याख्यान

ठाणे: आपले संगणक सुरक्षित राखणे हे डिजीटल युगासाठी सुरक्षीत आहे. व्हायरसचा धोका टाळण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट करणे गरजेचे आहे. अ‍ॅप्स डाऊनलोड करताना योग्य ती काळजी घ्यावी, गरेजे एवढेच अ‍ॅप्स डाऊनलोड करावे, मोबाईलमध्ये अधिकृतच अ‍ॅप्स घ्यावे. ज्या मोबाईलवरुन पैशांचे व्यवहार केले जातात त्या मोबाईलवर गेम्स किंवा इतर अ‍ॅप्स डाऊनलोड करु नये असा सल्ला ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. आल्हाद आपटे यांनी दिला.
जिज्ञासा ट्रस्ट ठाणे व लोकजागर, ठाणे आयोजित सी.डी. देशमुख - दिलीप महाजन स्मृती व्याख्यान अंतर्गत ‘डिजीटल जग व सायबर सुरक्षा’ या व्याख्यानात ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. आल्हाद आपटे यांचे व्याख्यान मंगळवारी गोखले रोड येथील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात पार पडले. सायबर सुक्षेच्या गाभ्यात माहिती असते. त्यात माहितीची गोपीनीयता असावी, ज्याला माहिती मिळविण्याचा अधिकार आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणीही ती माहिती मिळवू नये. त्यात सतत्या असावी म्हणजे मिळविलेली माहिती पूर्ण व अचूक आहे याची खात्री देणारी असावी, अधिकृतरित्या ज्या स्थळी माहिती मिळणे महत्त्वाचे आहे तिथे मिळावे. या सायबर सुरक्षेच्या तीन महत्त्वाच्या गोष्टी मानल्या जातात. या सुरक्षेसाठी प्रणाली बनवावी लागते. परंतू ही प्रणाली गरजेपेक्षा कमी बनविली तर धोका वाढेल. कोणतीही सुरक्षा प्रणाली बनविताना धोका पडताळणे गरजेचे आहे. डिजीटल युगात सुरक्षेला धोका किती आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. एवढं करुनही काही घडले तर त्याचे होणारे परिणाम कमीत कमी कसे करता येईल, परिणाम झाले तर त्याचे दुष्परिणाम कमी करावे आणि एवढे करुनही सिस्टीम बंद पडली तर ती कमीत कमी वेळात, कमीत कमी खर्चात पुर्व पदावर कशी आणता येईल या तीन पातळ््यांवर सायबर सिस्टीम ही यंत्रणा बनविली जाते.

 

 

Web Title: Protecting your computer is safe for a digital era - Dr. Alhad Apte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.