खड्डा बुजवून मनसेने केला निषेध, यापूर्वीही ठाण्यात केले होते आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 03:33 AM2018-07-16T03:33:55+5:302018-07-16T03:33:56+5:30

शहरातील विविध ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांच्या समस्येप्रकरणी प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी मनसेने आंदोलन केले होते.

The protest against the MNS by brutalizing the pit, has already been done in Thane | खड्डा बुजवून मनसेने केला निषेध, यापूर्वीही ठाण्यात केले होते आंदोलन

खड्डा बुजवून मनसेने केला निषेध, यापूर्वीही ठाण्यात केले होते आंदोलन

Next

ठाणे : शहरातील विविध ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांच्या समस्येप्रकरणी प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी मनसेने आंदोलन केले होते. रविवारी आझादनगर येथील कोलशेत रोडवर जाणाऱ्या रस्त्यावर मनसेने खड्डा बुजवून प्रशासनाचा पुन्हा एकदा निषेध नोंदवला.
शुक्रवारी खड्ड्यांत झोपून मनसेने अनोखे आंदोलन केल्यानंतर ठाण्यातील आझादनगर येथे पुन्हा एकदा मनसेने आंदोलन छेडले. आझादनगरवरून कोलशेत रोडकडे वळण असलेल्या रस्त्यावर काही दिवसांपूर्वी एक दुचाकीस्वार खड्डा चुकवताना अपघात होऊन जखमी झाला होता, असा आरोप करत असे अपघात होऊ नयेत म्हणून मनसेचे शाखाध्यक्ष हेमंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली आझादनगर येथील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून प्रशासनाचा निषेध नोंदवला.
नागरिकांच्या आमच्याकडे वारंवार तक्रारी येत होत्या. या तक्रारी लक्षात घेऊन आम्ही खडी, सिमेंट आणून या परिसरातील खड्डे बुजवले. आता सहायक आयुक्त यांच्याशी या समस्येबाबत चर्चा करणार असल्याचे मोरे यांनी सांगितले. यावेळी उपशाखाध्यक्ष गणेश चव्हाण, मनविसे उपशहराध्यक्ष प्रमोद पाताडे, प्रभागाध्यक्ष वसंत लोखंडे, उपविभागाध्यक्ष बाळू कांबळे, शाखाध्यक्ष दत्तात्रेय म्हेत्रे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: The protest against the MNS by brutalizing the pit, has already been done in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.