बिलावल भुट्टो प्रकरण: ठाण्यात पाकिस्तानविरोधात जोरदार आंदोलन, झेंडाही जाळला
By अजित मांडके | Published: December 17, 2022 04:52 PM2022-12-17T16:52:24+5:302022-12-17T17:03:32+5:30
यासाठी भाजपकडून ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पाकिस्तानच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.
ठाणे : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. या पाकिस्तानच्या विरोधात आज ठाण्यातील भाजप आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. यासाठी भाजपकडून ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पाकिस्तानच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.
बिलावल भुट्टो प्रकरणावर भाजप आमदार संजय केळकर यांची प्रतिक्रिया...#SanjayKelkarpic.twitter.com/KTFXwd2iTZ
— Lokmat (@lokmat) December 17, 2022
यावेळी भाजप तर्फे पाकिस्तानच्या झेंडा जाळण्यात आला. त्याचप्रमाणे बिलावल भुट्टो याचा प्रतीक्तम फोटो फाडून जोडे मारून त्याचा निषेध करण्यात आला. ज्या देशाचे स्वतःचे अस्तित्व नाही त्या देशाने भारतासारख्या सक्षम देशाच्या पंतप्रधानच विरोधात बोलणे हे चुकीचे आहे. संपूर्ण जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सल्ला घेतात आणि अशा प्रंतप्रधानांच्या विरोधात टीपणी केलेली खपून घेतली जाणार नसल्याचे भाजप कडून सांगण्यात आले.
बिलावल भुट्टो प्रकरणावर भाजपचे विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांची प्रतिक्रिया... #NiranjanDavkhare
— Lokmat (@lokmat) December 17, 2022
व्हिडिओ - अजित मांडके pic.twitter.com/x7e3CxWAPL