बिनशर्त आराेग्य सेवेत सामावून घेण्यासाठी एनएचएमच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ठाण्यात तीव्र आंदोलन
By सुरेश लोखंडे | Published: November 6, 2023 04:24 PM2023-11-06T16:24:42+5:302023-11-06T16:25:48+5:30
त्यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कायार्लयाबाहेर धरणे आंदाेलन करून राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले.
ठाणे : राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे एनएचएम विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी २००७ पासून आजपर्यंत कंत्राटी सेवेत असतानाही उतकृष्ठ सेवा दिली आहे. गेल्या १५ ते १६ वर्ष अत्यावश्यक आरोग्य सेवा देत काेराेनाच्या कालावधी आराेग्य विभागाच्या यंत्रणेत आघाडीवर असलेल्या या कंत्राटी डाॅक्टर, अधिकारी, कर्मचारी, परिचारीकांनी सर्वात्तम सेवा दिल्याचे उघड झाले आहे. मात्र आता मानधनावर सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना बिनाशर्त सेवेत सामावून घेण्यासाठी त्यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कायार्लयाबाहेर धरणे आंदाेलन करून राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीच्या नेतृवाखाली या कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून आंदाेलन सुरू केले आहे. आज त्यांनी रस्त्यावर उतरून ठाणे जिल्हाधिकारी कायार्लयाजवळील शासकीय विश्रामगृहासमाेर या कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदाेलन छेडले. या आंदाेलनकर्त्या च्या शिष्टमंडळाने येथील निवारी जिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांची भेट घेउन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. या राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचारी कृती समितीने मंत्रालयावर आक्राेश आंदाेलन आधीच सुरू केले आहे. त्यात सहभागी असलेल्या या आंदोलनकर्त्यांनी येथे आंदोलन छेडून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले.
जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेल्या आजच्या या आंदाेलनाचे नेतृत्व या कृती समितीचे पदाधिकारी मनिष खैरनार, प्रविण पाटील, विनाेद जाेशी, शामराव पाटील, सतिश देशपांडे, जयवंत विशे, राेशन पाटील आदींनी करून त्यांच्या प्रमुख् मागण्यांचे निवेदन यावेळी दिले. यामध्ये उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या आम्हा कर्मचाऱ्यांना राज्या शासनाने बिनशर्त सेवेत सामावून घ्यावे, शासकिय भरतीमध्ये ३० टक्के आरक्षणाऐवजी ५० टक्के आरक्षण लागू करा. जोपर्यंत शासकीय सेवेत समायोजन होत नाही, तोपर्यंत समान काम समान वेतन मिळावे आदी मागण्या यावेळी या आंदाेलनकर्त्या नी शासनाकडे लावून धरल्या आहेत.