उद्धव ठाकरे गटाचा निषेध पोलिसांनी रोखला; केदार दिघे म्हणाले...
By अजित मांडके | Published: January 10, 2024 09:20 PM2024-01-10T21:20:20+5:302024-01-10T21:23:35+5:30
अखेर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करीत हे आंदोलन मागे घेतले.
ठाणे : शिवसेना कोणाची या मुद्द्यावर बुधवारी विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचा निर्णय दिला. या निर्णयाच्या विरोधात ठाण्यात उद्धव ठाकरे गटाकडून चिंतामणी चौक जांभळी नाका येथे ठाणेशिवसेना जिल्हा शाखेच्या वतीने निषेध आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी हे आंदोलन होऊ दिले नाही. अखेर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करीत हे आंदोलन मागे घेतले.
विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निकालाचा निषेध करण्यासाठी बुधवारी ठाण्यात ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली रात्री आठच्या सुमारास निषेध आंदोलन करण्यात येणार होते. मात्र त्याचे वेळी पोलिसांनी या ठिकाणी या निषेध आंदोलनाला मज्जाव केला तसेच हे आंदोलन करू नका असे सांगत अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल असे देखील भूमिका घेतली शेवटी ठाकरे गटाने सामंजस्याचे भूमिका घेत केवळ निषेध व्यक्त करून येथून जाण्याचा मार्ग पत्करला.
विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल हास्यस्पद आहे. याच निकालाची अपेक्षा त्यांच्याकडून होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालात विरोधाभास आढळून आलेला आहे. त्यामुळे हे निषेध आंदोलन केल्याची माहिती केदार दिघे यांनी दिली.