कंत्राट भरती जीआर विषयी बीजेपीचे महाविकास आघाडीच्या निषेधार्थ ठाण्यात आंदाेलन
By सुरेश लोखंडे | Published: October 21, 2023 03:49 PM2023-10-21T15:49:15+5:302023-10-21T15:50:11+5:30
भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यानी एकत्र येऊन ही तीव्र निदर्शने शनिवारी केली.
ठाणे : सत्ता कालावधीत महाविकास आघाडीच्या सरकारने प्रशासनात कंत्राटी नाेकर भरती करून सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे भविष्य अंधारात ठेवले, असा आराेप करून त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीने (बीजेपी) आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जाेरदार निदर्शने केली. भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यानी एकत्र येऊन ही तीव्र निदर्शने शनिवारी केली.
येथील शासकीय विश्रामगृहासमाेर या कार्यकत्यार्ंनी आज एकत्र येत तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार् आंदाेलन छेडले. राज्यात कंत्राटी पद्धतीची सुरूवात महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात आलेली आहे. या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, तर महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात वेळोवेळी कंत्राटी पद्धतीने नाेकरी भरती झाल्याचा आराेप या आंदाेलनकत्यार्ंनी केला आहे. यामध्ये वाहनचालकांपासून लेखापाल पदापर्यंतच्या कंत्राटी नियुक्त्या करण्यात आल्या असून स्वयंपाकी, शिपाई, वसतीगृह रक्षक अशा चतुर्थश्रेणी पदांवरही कंत्राटी नियुक्त्या केल्याचे यावेळी उघड करण्यात आले.
या कंत्राटी भरतीमुळे हजारो बेरोजगारांवर नोकरीची टांगती तलवार ठेवण्यात आल्याचे वाघुले यांनी वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करते वेळी सांगितले. सध्या बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला जात असल्याचा आरोप या आंदाेलनकत्यार्ग्ंनी हाती पाेस्टरवरील विविध म्हणी व घाेषणांव्दारे केला आहे.
या आंदाेलनात प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, मनोहर सुगदरे, सचिन पाटील, विलास साठे, डॉ. समीरा भारती, माजी नगरसेवक नारायण पवार, मनोहर डुंबरे, मुकेश मोकाशी, भरत चव्हाण, जयेंद्र कोळी, सागर भदे, डॉ. राजेश मढवी, कैलास म्हात्रे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील, शीतल कारंडे, नताशा सोनकर, वृषाली वाघुले-भोसले आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.