आशा सेविकांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ उल्हासनगर महापालिकेवर निषेध मोर्चा
By सदानंद नाईक | Updated: March 17, 2025 19:54 IST2025-03-17T19:54:17+5:302025-03-17T19:54:34+5:30
शहरात असे काम करताना आशा सेविकांना अशा विविध प्रकाराला तोंड द्यावे लागते. असे संघटनेचे म्हणणे आहे

आशा सेविकांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ उल्हासनगर महापालिकेवर निषेध मोर्चा
उल्हासनगर - कॅम्प नं-४, भरतनगर येथे सर्वेक्षणासाठी गेलेल्या दोन आशासेविकाना गेल्या आठवड्यात मारहाण झाल्यानंतर, विठ्ठलवाडी पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. पोलीस वागणूक व मारहाण करणाऱ्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा यासाठी सोमवारी आशा सेविकांनी निषेध मोर्चा काढला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ भारतनगर परिसरात गेल्या आठवड्यात दोन आशासेविका कुष्टरोग व शयरोग आजाराचे सर्वेक्षण करीत होत्या. त्यावेळी त्यांनी एका घराचा दरवाजा माहिती घेण्यासाठी वाजवीला. मात्र घराबाहेर आलेल्या एका इसमाने महिलांना गलिच्छ शिवीगाळ करून दगडाने मारहाण केल्याचा प्रकार झाला. याबाबत तक्रार देण्यासाठी गेलेल्या आशा सेविकांना विठ्ठलवाडी पोलिसांनी तब्बल ५ तास बसून ठेवले. असा आरोप आरोप आशासेविकानी केला. अखेर आशासेविका युनियनचे पदाधिकारी भगवान दवणे, डॉ राजाराम रासकर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना फोन करून झालेला प्रकार सांगितल्यावर तक्रार घेतली.
आशासेविकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ व आरोग्य विभागाचे अधिकारी आशा सेविका यांच्या पाठीमागे उभे राहिले नाही. तसेच आशा सेविकांना मारहाण करणाऱ्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करणे, यासाठी आशा सेविकांना सोमवारी महापालिकेकर निषेध मोर्चा काढून, याबाबत निवेदन दिले आहे. शहरात असे काम करताना आशा सेविकांना अशा विविध प्रकाराला तोंड द्यावे लागते. असे संघटनेचे म्हणणे आहे