ठाण्यातील आव्हाडांच्या निवासस्थानबाहेर भाजपा महिला मोर्चाचे आंदोलन
By अजित मांडके | Published: January 4, 2024 05:32 PM2024-01-04T17:32:57+5:302024-01-04T17:33:11+5:30
आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेक राजकीय नेते तसेच पंडित महंतांनी देखील टीका केली.
ठाणे : प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, या वादग्रस्त वक्तव्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाडांच्या ठाण्यातील निवास स्थानाबाहेर गुरुवारी भाजपा महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी त्यांनी घोषणाबाजी केली. दरम्यान त्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्यांना हिंदू धर्माबद्दल आदर नाही त्यांना प्रभू रामचंद्रांनी सद्बुद्धी द्यावी, अशी प्रतिक्रिया मृणाल पेंडसे यांनी दिली.
आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेक राजकीय नेते तसेच पंडित महंतांनी देखील टीका केली. राष्ट्रवादी अजित दादा गटाच्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी देखील आव्हाडांच्या निवासस्थान जवळ जय श्रीराम च्या घोषणा देत, निषेध नोंदवला. गुरुवारी सकाळपासून आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून ठाण्यात आंदोलनाला सुरुवात झाली. ठाण्यातील भाजपा महिला मोर्चा माजी अध्यक्षा मृणाल पेंडसे यांच्या नेतृत्वाखाली आव्हाडांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.