नर्मदा बचओ आंदोलांनाच्या पाठिंब्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने
By सुरेश लोखंडे | Published: June 18, 2024 02:20 PM2024-06-18T14:20:08+5:302024-06-18T14:21:10+5:30
नर्मदा बचओ आंदोलांनाच्या वतीने नर्मदा खोऱ्यात बेमुदत आंदोलन जेष्ठ नेत्या मेधा पाटकर यांनी पुन्हा सुरू केले आहे.
ठाणे : नर्मदा बचओ आंदोलांनाच्या वतीने नर्मदा खोऱ्यात बेमुदत आंदोलन जेष्ठ नेत्या मेधा पाटकर यांनी पुन्हा सुरू केले आहे. बेदखल झालेल्या प्रतिनिधींचे साखळी उपोषण सुरू असून हजारो आंदोलक त्यांच्या पुनर्वसनाच्या हक्कावर ठाम आहेत. या न्याय्य मागण्या मान्य करून या आंदोलनाला वेळीच थांबवण्यात यावे आदी मागण्यांसाठी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्हाधिकार्याच्या मार्फत मागण्याचे निवेदन देण्यात आले.
सरदार सरोवर धरणाची पाणीपातळी १२२ एमएसवर कायम ठेवा ही प्रमुख मागणी घेऊन पाटकर यांच्या नेतृत्वाखाली बुडीत क्षेत्रातील हजारो गांवकरी, कार्यकर्त्यांनी शुक्रवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठीबा देऊन न्याय्य मागण्या मान्य कराव्या यासाठी येते निदर्शने करून मुख्यमंत्र्यांना मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यामार्फत देण्यात आले. या निदर्शनात श्रमिक जनता संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस जगदीश खैरालिया, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय डॉ. संजय गोपाळ, भारत जोडो अभियानचे राजेंद्र चव्हाण, बहुजन विकास संघाचे महासचिव नरेश भागवाने, कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिति निमंत्रक भास्कर गव्हाळे आदी नेते कार्यकर्त्यांनी या निदर्शनात सहभाग घेतला.
महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अजूनही शेकडा सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन करायचे बाकी आहे. मध्य प्रदेशात हजारो कुटुंबे आहेत, ज्यांचे पुनर्वसन होणे बाकी आहे. त्यांचे पुनर्वसन करा, सिद्ध झालेली बॅकवॉटरची पातळी (जुनी) स्वीकारा. बेकायदेशीरता आणि अनियमिततेमुळे घरे, शेते, गुरेढोरे, माणसे आणि सर्व मालमत्तेचे २०२३ मध्ये झालेल्या नुकसानाची बाजारमूल्याने भरपाई द्या. कायदे, धोरणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पूर्ण पालन करून सर्व प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन करा. मागण्या पूर्ण होईपर्यंत सरदार सरोवरची पाण्याची पातळी १२२ मीटर (क्रेस्ट लेव्हल) राखा, १७ मीटरचे दरवाजे उघडे ठेवा आदींसाठी आज ही निदर्शने करण्यात आली.