महात्मा गांधी पुतळा खाली काळ्या फिता लावून ठिय्या, राष्ट्रवादीकडून हल्ल्याचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 02:19 PM2022-04-09T14:19:40+5:302022-04-09T14:20:23+5:30
एसटी कामगारांनी मर्यादा ओलांडून गुन्हेगाराप्रमाणे पवार साहेब यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
उल्हासनगर : राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध पक्षाच्या शहाराध्यक्षा पंचम कलानी यांच्यासह शहर कार्यकारिणीने केला. एसटी कामगाराच्या पाठीमागे सदैव उभे राहणाऱ्याच्या घरावर हल्ला करणारे एसटीचे कामगार होऊ शकत नाही, अशी नाराजी शहर पदाधिकार्यांनी दिली.
उल्हासनगर महापालिका प्रांगणात महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या खाली राष्ट्रवादी पक्षाच्या शहाराध्यक्ष पंचम कलानी, पक्षाचे पदाधिकारी मनोज लासी, कमलेश निकम, शिवाजी रगडे, पियुष गोयल, सुंदर मुदलियार यांच्यासह असंख्य पदाधिकारी सकाळी साडे ११ वाजता एकत्र आले. त्यांनी काळ्या फिती बांधून राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध केला. भर उन्हात त्यांनी काही काळ ठिय्या आंदोलन करून हल्ल्या मागील मास्टर माईंड याला अटक करण्याची मागणी केली. तसेच एसटी कामगारांनी मर्यादा ओलांडून गुन्हेगाराप्रमाणे पवार साहेब यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
शहाराध्यक्ष पंचम कलानी एक अप्रत्यक्ष शक्ती समाजासमाजा मध्ये तेढ निर्माण करीत असून याप्रकारने देश पुढे जाण्या ऐवजी मागे येत असल्याचे सांगून हल्ल्याचा जोरदार विरोध केला. काळ्या फिती लावून भर उन्हात ठिय्या देणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी शरद पवार यांच्या नावाने जिंदाबादच्या घोषणा देऊन मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला.