इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:48 AM2021-03-01T04:48:05+5:302021-03-01T04:48:05+5:30
ठाणे : केंद्र सरकारने इंधनाच्या तसेच घरगुती सिलिंडरच्या दरात प्रचंड दरवाढ केली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ पाचपाखाडी येथील शेल ...
ठाणे : केंद्र सरकारने इंधनाच्या तसेच घरगुती सिलिंडरच्या दरात प्रचंड दरवाढ केली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ पाचपाखाडी येथील शेल पेट्रोलपंपाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने रविवारी निदर्शने करून निषेध नोंदविण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि महिला अध्यक्ष सुजाता घाग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गॅस, पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ पेट्रोलपंपासमोरच ही निदर्शने केली. यावेळी सुरेखा पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या दोन महिन्यांमध्ये सिलिंडरच्या दरात साधारणपणे शंभर रुपयांची दरवाढ झाली. त्यामुळे आता महिलांवर चूल पेटविण्याची वेळ आली आहे, पण ही दरवाढ मागे न घेतल्यास केंद्र सरकारलाच आम्ही चुलीवर बसवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
या आंदोलनामध्ये कोपरी-पाचपाखाडी विधानसभा अध्यक्ष फुलबानो पटेल, कळवा अध्यक्षा साबिया मेमन, प्रदेश प्रतिनिधी ज्योती निम्बर्गी, शशिकला पुजारी, कल्पना नार्वेकर आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
.....................
फोटो: २८ ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन